आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिव्हॉल्व्हरचा धाक; दोन घरांत ४.२५ लाखांचा दरोडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोडनिंब; शहरातील संभाजी नगर शिवनेरी हॉटेलजवळ शनिवार (दि. १७) मध्यरात्रीनंतर रिव्हॉल्व्हर चाकूचा धाक दाखवत दरोडेखोर घरात घुसले. विजय गिड्डे राजेंद्र कांबळे यांच्या घरावर दरोडा टाकत दोन घरांमधून लाख १५ हजारांचा ऐवज लुटून नेला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेसह सुवर्णा गिड्डे राजेंद्र कांबळे किरकोळ जखमी झाले.
शुक्रवारी (दि. १६) रात्री संभाजी नगरातील विजय अमृत गिड्डे यांच्यासह कुटुंबीय जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील चार दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. विजय गिड्डे यांना जाग आल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला चाकू लावला तर एकाने रिव्हॉल्व्हर रोखून धरत आरडाओरडा केल्यास गोळी घालण्याची हिंदीतून धमकी दिली. विजय यांच्या काकू सुवर्णा दुसऱ्या खोलीत निद्रिस्त होत्या. आवाज ऐकून त्यांना जाग आली. दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडावर लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या. दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेतले. दुसऱ्या खोलीत त्यांच्या आईवडिलांना कोंडून ठेवले. रोकड सोन्याचे दागिने असा दोन लाख ८५ हजारांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान, घरात घुसताना दरोडेखोरांनी कुत्र्याला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला.

त्यानंतर रात्री अडीच ते तीनच्या सुमारास दरोडेखोर हॉटेल शिवनेरी शेजारील राजेंद्र भैरू कांबळे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसले. रिव्हॉल्व्हर चाकूचा धाक दाखवला. तसेच कांबळे पतीपत्नी त्यांच्या तीन मुलींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गावठी कट्ट्याने डोक्यावर केलेल्या मारहाणीत राजेंद्र कांबळे जखमी झाले. त्यांना दमदाटी करून शांत बसण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या घरातील रोकड सोन्याचे दागिने असा एक लाख ३५ हजारांचा ऐवज लुटून नेला. जाताना कांबळे यांचा माेबाइल फोडून घराला बाहेरून कडी लावली.

याप्रकरणी विजय गिड्डे राजेंद्र कांबळे यांनी फिर्याद दिली. टेंभुर्णी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक के. एन. पाटील तपास करत आहेत.

श्वानपथक घुटमळले
पोलिसांनीश्वानपथकाला पाचारण केले. मात्र श्वान रेल्वे स्टेशन परिसरात घुटमळल्याचे पोलिसांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी तिरुपती काकडे यांनी घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना सूचना दिल्या.

दोघे घराबाहेर थांबले तर चौघे घरात घुसले
सहादरोडेखोरांपैकी दोघे घराबाहेर थांबले तर चारजण घरात घुसले होते. त्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधले होते. त्यापैकी दोघे मराठी तर दोघे हिंदीत बोलत होते, असे राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. मध्यवस्तीत दोन धाडसी दरोडे पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.