आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिक्षा आता प्रवाशांना शहराबाहेरही नेणार, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - परवानाधारक अॉटोरिक्षांचे शहरापुरते असलेले कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार आरटीओ प्रशासन करत आहे. महापालिकेपुरते असलेले क्षेत्र दक्षिण उत्तर सोलापूर तालुक्यापर्यंत वाढवण्यात येणार आहे.
अॉटाेरिक्षांचे कार्यक्षेत्र वाढले तर शहरी आणि दक्षिण, उत्तर सोलापूर तालुक्यातील अधिकृत रिक्षाचालकांना फायद्याचे ठरणार आहे. नियमाप्रमाणे शहर रिक्षा शहराच्या हद्दीबाहेर नेता येत नाहीत. त्या आढळल्या तर त्यांच्यावर कारवाईची तरतूद आहे.

नागरिकांच्या रिक्षाचालकांच्या अथवा युनियनच्या काही हरकती असल्यास त्यांनी आपल्या सूचना हरकती २० अॉक्टोबरपर्यंत आरटीओ कार्यालयाकडे लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे अावाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

जिल्हा परिवहन प्राधिकरणाची बैठक नुकतीच पार पडली. यात अॉटोरिक्षांच्या परवान्याच्या कार्यक्षेत्रात फेररचना करण्याविषयी चर्चा झाली. नागरिकांनी सूचना हरकती मांडल्यानंतर त्यावर सविस्तर अभ्यास करून कार्यक्षेत्रात बदल करण्यात येईल. दरही नक्की केले जातील. यामुळे अनधिकृत रिक्षांना चांगलाच चाप बसेल, अशी शक्यता आरटीओ प्रशासनाने वर्तवली आहे.

सूचना मांडाव्यात
^अॉटोरिक्षांचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार आहे. जिल्हा परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. नागरिकांनी यावर हरकती सूचना मांडाव्यात. सूचनांचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल.” बजरंग खरमाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...