आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिपन हॉल नूतनीकरणास लागणार किमान महिने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पासपोर्ट कार्यालयासाठी रिपन हॉल ताब्यात घेत असताना एका महिन्यात कार्यालय सुरू करू, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रिपन हॉलमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया होताना दिसत नाही. यामुळे जागा शोधण्यात वर्ष गेले, आता नूतनीकरणाला किती वर्षे लागणार ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अधिक माहिती घेतली असता सार्वजनिक बांधकाम विभागास नूतनीकरणाचे अंदाजपत्रक करण्याचे आदेश पासपोर्ट कार्यालयाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
केंद्र शासनाने सोलापूर जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय मंजूर केल्यानंतर जागा शोधण्यासाठी किमान वर्षाचा कालावधी लागला. अखेर वर्षाच्या शोधानंतर पासपोर्ट कार्यालयास रिपन हॉलची जागा उपलब्ध झाली. महापालिकेने ही जागा पासपोर्ट अधिकारी यांच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्दही केली. नूतनीकरण पूर्ण होताच कार्यालय सुरू करू, असे आश्वासन पासपोर्ट अधिकारी यांनी जाहीर कार्यक्रमात िदले होते. रिपन हाॅलची जागा ताब्यात घेऊन महिना होत आला तरी अद्याप रिपन हॉल येथे कोणतेही काम सुरू झाले नसल्याचे दिसते.

रिपन हॉल नूतनीकरणामध्ये हॉलवरील सर्व पत्रे जीर्ण झाल्याने ते पूर्णपणे बदलण्यात येणार आहेत. अंतर्गत कार्यालयाचे फर्निचर, संरक्षक भिंत, विद्युतीकरण, टॉयलेट यासह इतर गोष्टींचा समावेश असणार आहे. या सर्व कामांचे अंदाजपत्रक बांधकाम विभागाकडून पुणे पासपोर्ट कार्यालयास १५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात येणार आहे.

या अंदाजपत्रकास दिल्ली येथील प्रमुख पासपोर्ट कार्यालयाची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर टेंडर प्रक्रिया आणि नूतनीकरणाच्या कामास सुरुवात होणार आहे.

Ãपुणे पासपोर्टकार्यालयाकडून ऑक्टोबरला रिपन हॉल नूतनीकरणाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार आम्ही अंदाजपत्रक तयार करत आहोत. १५ ऑक्टोबरपर्यंत आम्ही रिपन हॉल नूतनीकरणाचे अंदाजपत्रक पुणे पासपोर्ट कार्यालयास सादर करणार आहे. अंदाजपत्रकास मंजुरी मिळताच तातडीने टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल. पी.सी. रेळेकर, शाखा अभियंता
२६ जानेवारी रोजी

सुरू होणार कार्यालय
Ãपासपोर्टकार्यालयासाठी मिळालेल्या रिपन हॉलचे नूतनीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार केले जात आहे. अंदाजपत्रक प्राप्त होताच त्याला दिल्ली कार्यालयाची मंजुरी घेऊन प्रत्यक्षात काम सुरू करणार आहे. हे काम पूर्ण होण्यास महिने लागतील, २६ जानेवारी रोजी प्रत्यक्षात कार्यालय सुरू करण्याचे नियोजन आहे. अतुल गोतसुर्वे, पासपोर्ट अधिकारी, पुणे
बातम्या आणखी आहेत...