आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदी, ओढ्यातील गाळ काढण्यासाठी १४ कोटी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर : जलयुक्तशिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील नदी, ओढा, नाल्यांतील गाळ काढणे, सरळीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी १४ कोटी ८९ लाख रुपये मंजूर झाले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. 
 
लोकसहभागातून नदी, ओढा, नाले पुनर्जीवन करण्याची योजना आखण्यात आली. त्या अंतर्गत पुनर्जीवन प्रस्तावास मान्यता देण्याची मागणीही श्री. देशमुख यांनी केली होती. यामध्ये मोहोळ येथील कोरवली नदी, वांगीरा नदी, सीना नदी, माढा येथील बेंद मेंड ओढा, सांगोला येथील अप्रुपा नदी, करमाळ्यातील सीना नदी, मंगळवेढ्यातील दौडा नाला हुन्नूर, पडोळकडवाडी यांचा समावेश आहे. यासाठी तब्बल १४ कोटी ८९ लाख एवढी रक्कम मंजूर झाली. 
 
सोलापूर जिल्ह्यात टंचाई परिस्थिती असल्याने माढा, मोहोळ, बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा, मंगळवेढा येथील नदी ओढा नाल्याचे खोलीकरण, रुंदीकरण व्हावे यासाठी निधी उपलब्ध करावा असेही श्री. देशमुख म्हणाले होते. 
 
निधी मिळाल्याने पाणी अडवणे, जिरवणे आणि साठवण क्षमता वाढीसाठी मदत होईल. परिसरातील शेती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास श्री. देशमुख यांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...