आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थानिक लोकांच्या बेदरकार वृत्तीमुळे हायवेवर जाताहेत अनेकांचे हकनाक बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वार शुक्रवार. दिनांक १४ ऑक्टोबर २०१६. वेळ सकाळी ८.३० ची. स्थळ सोलापूर ते पुणे महामार्गावरील पाकणी गाव. अक्कलकोटचा अलोणे परिवार आपल्या बोलेरे गाडीतून प्रवास करत येथून जात होता. ओंकार अलोणे हे मध्यम लेनमधून गाडी चालवत होते. समोरून एक माणूस हायवे क्रॉस करत असल्याचे अचानक दिसले. गाडीचा वेग पाहता गाडीखाली तो माणूस येणार हे लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी स्टेअरिंग गर्रकन फिरवली. हायवेवरच किरकोळ कारणासाठी उभा असलेला टँकर काळ ठरला. त्यावर बोलेरे वेगाने आदळली. आलोणे परिवारातील चार जण जागीच ठार झाले.

बहुतेक अपघात होण्यामागे मानवी चुका हेच कारण
महामार्गावरून आनंदाने वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांच्या पालनाकडे साफ दुर्लक्ष होऊ लागले आहे. मार्गावरील बहुतेक अपघात मानवी चुकांमुळे झालेले आहेत. या महामार्गावर वाहन थांबवायचे नसते. लेन कटिंग करायची नसते तसेच वेगाची मर्यादा ओलांडायची नाही या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात येते. मार्गावर वाहन ट्रॅकिंग करणारी यंत्रणा नाही. त्यामुळे या महामार्गावर अपघात वाढले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लेन कटिंग, वेगाची स्पर्धा आणि वाहनचालकांच्या डुलक्या यामुळे होणारे अपघात कसे रोखायचे, असा प्रश्न आहे.

व्हावा असा प्रयोग
पुणे -मुंबई द्रुतगती महामार्ग हा देशातील सर्वाधिक वर्दळ असलेला महामार्ग आहे. यावर दररोज किमान अपघात होतोच. सरकारने एका स्वयंसेवी संघटनेच्या मदतीने या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दीड लाख झाडे लावण्याची योजना केली आहे. त्यांची देखभाल या महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ३२ गावांतील ३० हजार गावकऱ्यांच्या मदतीने केली जाणार आहे. जेथे माणसे, जनावरे दुचाकीचालक हायवेवर सरळ येऊ शकतात. अपघात टाळायचे असतील तर हे अतिक्रमण अगोदर बंद केले गेले पाहिजे. यासाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूंना झाडे लावून त्यांचे फेन्सिंग केले जात आहे. सोलापूर -पुणे महामार्गावरही असा प्रयोग व्हावा.

चौघे जागीच मृत्युमुखी पडले. ओंकार अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. अगदी बेदरकारपणे हायवे क्रॉस करणारा तो अज्ञात इसम अजूनही अज्ञातच राहिला आहे. खरे तर तो या भयानक अपघाताचे मुख्य कारण ठरला, तरीही रेकॉर्डवर तसा कोठेही उल्लेख नाही.

जेथे गाव आहे तेथे महामार्गावरील दुभाजकातूनच ये- जा केली जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हॉटेल्स, पेट्रोल पंप, पान शॉप, पंम्चर काढणारी दुकाने असतात. यासाठी रहदारी होतेच. हायवे क्रॉस करण्यासाठी सहा इंच उंचीचा डिव्हायडर ओलांडणे हा स्थानिक नागरिकांना आपला हक्कच वाटतो. भले भीषण अपघात होऊ द्या, परिस्थिती बदललेली नाही. हायये क्रॉस करणे, दुचाकीसह हायवे ओलांडणे हे भीषण अपघाताचे कारण आहे.
^महामार्गावर सलगजेथे अपघात होतात, त्याला ब्लॅक स्पॉट म्हणता येईल. हायवेवर काही ब्लॅक स्पॉट आहेत. तांदूळवाडीजवळ असा एक स्पाॅट आहे. लांबोटी गावाजवळ सलग उतार आहे. महामार्गावरील कोणत्याही लेनमध्ये गाडी उभी करू नये. हायवे क्राॅसिंग करू नये, अशा सूचना, जागृती सातत्याने करण्यात येते. हायवेवरील काही ठिकाणी डिव्हायडर तुटले आहेत. तसेच डिव्हायडरमधून वाहने, दुचाकी आडवी जाणे असे प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देतात. यासाठी स्थानिक नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. महामार्ग प्राधिकरणाला डिव्हायडरच्या मध्ये फेन्सिंग करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात आला आहे.'' पी.आय. काशीद, महामार्ग वाहतूक पोलिस केंद्र, कोंडी

पाकणी येथील अपघातात चक्काचूर बोलेरो गाडी तालुका पोलिस स्टेशनमध्ये लावली होती.
हायवेवरील अपघातांची विविध कारणे
Áवाहनाचा टायरअचानक फुटणे, पंम्चर होणे
Áवेगातअसतानाअचानक लेन बदलणे
Áहायवेवरभरधाववेगाे वाहन चालविणे
Áलेनवरचवाहनेउभी करणे
Áहायवेक्रॉसकरणारी माणसे, वाहने प्राण्यांना वाचवण्याचा अचानक प्रयत्न करणे
Áहायवेवरीलखड्ड्यांचा,दगडांचा अंदाज लागणे
Áवळण,वळणावरीलझाड, पुलाचा कठडा नजरेतून सुटणे
नियम मोडून हायवे क्राॅस करणे बेतते इतरांच्या जीवावर

^महामार्गावर जनावरे,माणसे, चक्क दुचाकी गाड्या इकडून तिकडे बेदरकार पद्धतीने क्राॅस होतात. यामुळे मोठे अपघात होतात. सोलापूर विद्यापीठासमोर ज्याप्रमाणे लोखंडी जाळी लावून अशी वाहतूक पूर्ण बंद केली आहे, तशी उपाययोजना ज्या ज्या ठिकाणी गावे आहेत, तेथे अपेक्षित आहे. नुकतीच वडवळजवळ एक म्हैस हायवे क्राॅस करीत होती. एसटी बसने तिला ठोकरले. लहान वाहन असते तर जीवित हानी निश्चित होती. वाहने, जनावरे, माणसे कोठूनही हायवे क्रॉस करतात. भरधाव वेगात जात असणाऱ्या चालकांचे लक्ष विचलित होते. यातून असे अपघात घडतात. फक्त चालकाला दोष देण्यापेक्षा सर्वांनी काही नियम पाळणे गरजेचे आहे.'' चिदानंदपाटील, सोलापूर
बातम्या आणखी आहेत...