आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकाशावर १८ तर प्रत्यक्षात केवळ १० मीटर रुंदीचा रस्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सम्राटचौक ते कोंतम चौक हा २.६८ किमी रस्ता ९.६१ कोटी रुपये खर्च करून नगरोत्थान योजनेतून करण्यात येत आहे. महापालिका नकाशावर रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार मक्ता देण्यात आला. महापालिकेकडून मोजणी केली असता रस्त्याची रुंदी काही ठिकाणी १२ मीटर आढळली. प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी १० मीटर रुंदी आहे. मक्ता १८ मीटरचा पण प्रत्यक्षात १० मीटर रस्त्याचे काम सुरू असल्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना विचारले असता १८ मीटर रस्ता करणार असल्याचे सांगितले.
सम्राट चौक ते कोंतम चौक दरम्यान रस्त्याचे काम करण्यात येत आहे. सम्राट चौक ते कुंभार वेसपर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे. काम घाईघाईने उरकण्याचा प्रयत्न होताना दिसतो. प्रत्यक्षात रस्ता १८ मीटर नाही. हलते अतिक्रमण काढले नाही. अतिक्रमण केलेले फलक काढले नाही, रस्त्यावर असलेले थांबा काढले नाही.

अतिक्रमण काढले नाही
सम्राट चौकात रस्त्याची रुंदी १५ मीटर आहे. तेथे पदपथ करणार कुठे. शिवगंगा मंदिर परिसरात शक्य असलेले अतिक्रमण काढलेच नाही. बलिदान चौकात रस्त्याची रुंदी केवळ १० मीटर.

^रस्त्याची रुंदी१८ मीटर असणे आवश्यक आहे. काही ठिकाणी तितका रस्ता नाही. त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी नगर रचना कार्यालयास पत्र दिले. अतिक्रमण काढून १८ मीटर रस्ता करण्यात येईल. लक्ष्मण चलवादी, प्रभारीनगर अभियंता

^काही भागात१८ मीटर रुंदी मिळत नाही. अतिक्रमण आहे ते काढण्यास महापालिकेला वारंवार पत्र दिले. मक्ता १८ मीटरचा आहे त्यानुसार भूसंपादन आणि अतिक्रमण काढल्यावर तो पूर्ण करू. वैभव महाजन, प्रकल्प सल्लागार

हे का नाही?
नऊ काेटी रुपये खर्च करून रस्ता करत असताना रस्त्याच्या खाली असलेले ड्रेनेज आणि पाइपलाइन एका बाजूस घेतले गेले नाही. पाइपलाइन जीर्ण असून, त्यावर रस्त्या केल्यास पाइपलाइन फुटेल ती दुरुस्तीसाठी रस्ता खोदला जाईल. कोट्यवधी रुपये खर्च करून पुन्हा रस्ता खोदण्याची वेळ येईल.

रस्त्याची रुंदी उघड होताच आली जाग
१८ मीटर रुंदीच्या रस्त्याचा मक्ता दिला असताना १५ ते १० मीटर रस्ता करण्यात येत आहे, असा मुद्दा उपस्थित होताच महापालिका अधिकाऱ्यांनी बुधवारी रस्त्याची मोजणी केली. उपअभियंता सारिका आकुलवार, प्रोजेक्ट सल्लागार वैभव महाजनसह इतर अधिकारी होते. काही ठिकाणी १८ मीटर रस्ता नसल्याचे निदर्शनाला आले.
बातम्या आणखी आहेत...