आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची कामे वारंवार, दर्जा नसल्याने पुन्हा उखडतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुनापुना नाका ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता करून पाच महिनेच झाले असून पांजरापोळ चौक परिसरात हॉटेल पांचाली समोरचा रस्ता उखडला आहे. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती तीन वर्षापर्यंत मक्तेदाराकडे आहे. त्याची दुरुस्ती मक्तेदाराने केली. खड्डे पडले म्हणून या रस्त्याचे काम करण्यात आले. या कामासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला होता. हे काम मे-जून महिन्यात झाले होते. गेल्या आठवडाभरापासून पावसाचा जोर वाढला असून सोलापूर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. या एकाच पावसामुळे पांजरापोळ चौक परिसरातील हाॅटेल पांचाली समोरचा रस्ता उखडला आहे. अवघ्या चार ते पाच महिन्यात रस्ता उखडल्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाचा मक्ता पाटील अॅन्ड कंपनीला देण्यात आला आहे.
फेब्रुवारी ते मेपर्यंत कामे व्हावीत
खड्डे बुजविण्यासाठी राज्य सरकारने हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे फेब्रुवारी ते मे दरम्यान कामे करावीत असे स्पष्ट अादेश काढले अाहेत. पण महापालिका त्याचे पालन करीत नसल्याचीच उदाहरणे समोर येताहेत. महापालिका तर हे पाहातच नाही, पण सार्वजनिक बांधकाम विभागही ते पाळत नसल्याचे दिसते. राष्ट्रीय महामार्ग विभागानेही पांजरापोळ चौक ते रेल्वे स्टेशन चौक या दरम्यानचा रस्ता दुरूस्त करताना िनयम धाब्यावर बसविला. एेन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले अस्तरीकरण केले. पावसात खड्डेच खड्डे पडले. सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले होते. अाता पुन्हा बुधवारी रात्री याच रस्त्यावर अस्तरीकरण करण्यात अाले. तेही अोबडधोबड झाले अाहे.
पांजरापोळ चौकात जलवाहिनीचे काम केले आणि रस्त्यावर सर्व खडी पसरली. ती खडी वाहनांखाली आली. तसेच येथे पाणी साचले आणि रस्ता करताना बॅरीकेटमुळे सेंटरचा भागचे व्यवस्थित रोलिंग झाले नाही. या तीन कारणामुळे तेवढाच भाग उखडला आहे. दर्जा खराब झाला असता तर संपूर्ण रस्ता उखडला असता. जे खराब झाले आहे ते त्वरीत दुरुस्ती होईल. अशोक भोसले, उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग
बातम्या आणखी आहेत...