आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रखडलेल्या ५४ मीटर रस्त्याचा ‘मार्ग’ खुला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जुनापुणे नाक्याहून विजापूर महामार्गकडे जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम भूसंपादनाच्या कारणाने सुमारे दहा वर्षांपासून रखडले होते. ते मार्गी लागण्याची चिन्हे आहे. महापालिकेने प्रस्तावित मार्गावरील जमीन मालकांची बुधवारी बैठक घेतली. तीत सुमारे ९० टक्के लोकांनी जागा देण्यास तयारी दाखवली आहे.

पुणे राष्ट्रीय महामार्गवरून विजापूर राष्ट्रीय महामार्गकडे जाण्यासाठी आता शहरातून जावे लागते. त्यामुळे शहरात विशेषत: शिवाजी चौकात वाहतूक कोंडी होते. ती कमी करण्यासाठी अवंती नगरमार्गे सोरेगाव एसआरपी कॅम्पपर्यंत ५४ मीटर रुंदीचा ८.५ किमी लांबीचा रस्ता प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादन काम सुरू आहे. त्यात अडचणी येत होत्या. माजी महापौर मनोहर सपाटे यांनी पुढाकार घेत जागा मालकांची बैठक घेतली. जागा मालकांनी तयारी दर्शवली आहे, अशी माहिती महापालिका नगर रचना अधिकारी महेश क्षीरसागर यांनी दिली.

एकूणदोन बैठका
एकूणदोन बैठका झाल्या. बुधवारी सलगर वस्ती येथील अक्षता पाॅम्स येथे बैठक झाली. महापालिकेचे अधिकारी, विकसक रणजित शहा, प्रदीप पिंपरकर, सुनील फुरडे आदी उपस्थित होते. जागा देण्यास ९० टक्के मालकांनी संमती दिली. त्यांना शासकीय टीडीआर (ट्रान्सफर फॉर डेव्हलपमेंट राइट्स) दर देण्याचे पत्र देण्यात आले.

काय होईल फायदा?: रस्ताझाल्यास शहरात पुणे रोडवरून येणारी वाहतूक बायपास मार्गे जाईल. त्यामुळे शिवाजी चौकात वाहतूक कोंडी कमी होईल. याशिवाय पुणेहून विजापूरकडे जाणारे वाहने शहराऐवजी बायपासने जातील. त्यामुळे वाहतूक जलद होईल आणि वेळ वाचेल. शहरात अपघाताचे प्रमाण कमी होईल.

रस्ता काहीसा वळवला
देशमुखपाटील वस्ती येथे संपादन केलेल्या रस्त्यावर झोपडपट्टी वसली, ते काढणे जिकरीचे असल्याने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी आयुक्तांचे अधिकार वापरून त्या परिसरातील रस्ता किंचीत वळवला.

असा आहे प्रस्तावित रस्ता
जुनापुणे नाका ते अवंती नगर, मंगळवेढा रस्ता ते सलगर वस्ती, राजस्व नगर ते प्रताप नगर तेथून सोरेगाव एसआरपी कॅम्प.

वाहतुकीची कोंडी, अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि अविकसीत भाग विकासाखाली येईल. त्यामुळे महापालिकेस विकास शुल्क मिळेल. ५४ मीटर रस्ता होणे आवश्यक आहे. आताची परिस्थिती पाहता रस्ता होईल असे वाटते.” प्रदीपपिंपरकर, विकसक
बातम्या आणखी आहेत...