आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता दर्जाबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी मूग गिळून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सम्राटचौक ते कोंतम चौक या दरम्यान होत असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत महापालिकेचे कसलेही नियंत्रण नाही. दर्जा तपासणीसाठी नेमलेल्या एजन्सीकडे (प्रकल्प सल्लागार) बोट दाखवून मनपा अधिकारी रस्ता झाल्यानंतर दर्जा तपासू, असे सांगत अाहेत. टेंडर काढताना १८ मीटर रुंदीचा रस्ता नमूद अाहे. पण प्रत्यक्षात ती रुंदी नाही. रस्त्याचा दर्जा पाहिला तर येत्या वर्षात पावसाळ्यात हा रस्ता पुन्हा खड्डेमय होईल, अशीच स्थिती सध्याची अाहे. या रस्त्यावर कोटी १९ लाख रुपये खर्च होत अाहेत.
हा रस्ता करण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी काही ठिकाणी भूसंपादन करणे गरजेचे होते. सध्याच्या कोणत्याही बांधकामाला, बसस्टाॅपला धक्का लावता रस्त्याचे काम चालू अाहे. त्यामुळे नागमोडी वळणाचा रस्ता अाणि ठरलेल्या रुंदीप्रमाणेही नाही अशी स्थिती अाहे. घाई-घाईने हे काम होत असल्याचे सध्याच्या कामावरून दिसते अाहे. सम्राट चौक ते नीलानगरपर्यंतचा रस्ता वगळता अन्य ठिकाणी टेंडरनुसार १८ मीटर रस्त्याची रुंदी मिळून येत नाही. त्यामुळे सम्राट चौक ते कोंतम चौक या दरम्यान रस्ता १८ मीटर होणे शक्य नाही. रस्त्याची खोली दीड फूट असणे अावश्यक असताना त्यानुसार काम होते का नाही? याबाबत महापालिकेकडून तपासणी केली जात नाही. प्रकल्प सल्लागारांवर मनपा अवलंबून आहे.

खोलीबाबत काय? : १.६फूट खोल खोदून त्यात तीन प्रकारचा रस्ता करणे आवश्यक आहे. तसे त्यात नमूद असताना त्यानुसार काम होते की नाही, हे मनपाकडून पाहिले जात नाही. मनपा अधिकारी म्हणतात, त्याची तपासणी एजन्सी करणार अाहे. त्यानंतर अाम्ही दर्जा तपासू. प्रत्यक्ष रस्त्याचे काम होत असताना महापालिकेचे अभियंते जागेवर थांबून तपासणी करण्याची गरज अाहे. पण तसे होत नाही. दर्जाच्या सगळ्या बाबी कागदोपत्री केल्या जात असल्याचे दिसते.
डीपीआर कसा
रस्त्यावर १८ मीटर रुंदी सापडणे शक्य नसताना महापालिकेने डीपीआर केला कसा? तात्पुरते अतिक्रमण असेल तर ते काढण्याची जबाबदारी निश्चित केली असेल तर त्यानुसार काम का केले जात नाही?

पुन्हा रस्ता खोदकाम
आसरा पूल ते मजरेवाडी गेटपर्यंत नगरोत्थान योजनेतूून रस्ता करण्यात आला. तो आठ दिवसात पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्तीसाठी खाेदला. असाच प्रकार या रस्त्यावर होण्याची शक्यता आहे. जीर्ण पाइप रस्ता करण्यापूर्वीच बदलणे आवश्यक आहे. अन्यथा रस्ता केल्यावर खोदण्याची पाळी येईल. त्यावेळी मक्तेदारांची जबाबदारी असणार नाही. पुन्हा खोदकाम रोखण्यासाठी आताच मनपाकडून काम होणे आवश्यक आहे.

सम्राट चौक : १५
शिवगंगा मंदिर : १२
बलिदान चौक : १२
गोल तालीम परिसर : १०
कांेतम चौक परिसर :

पाणी साचणार नाही याची दक्षता
^रस्त्याची मोजणीकेली. १८ मीटरचा रस्ता करण्यात येईल. नियमानुसार रस्ता करण्यात येत आहे. पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. लक्ष्मण चलवादी, प्र.नगर अभियंता
सम्राट चौक ते कोंतम चौक रस्त्याचे मोजमाप घेताना.
बातम्या आणखी आहेत...