आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसस्थानकातील रस्ते सुधारणार, अर्थसंकल्पात सोलापूर बसस्थानकाच्या विकासासाठी निधी मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाचे नूतनीकरण होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापूर बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी निधी मंजूर झाला. या निधीच्या माध्यमातून सोलापूर बसस्थानकाच्या अंतर्गत रस्त्यांचा विकास सोलापूर बसस्थानकावरील बार्शी कुर्डुवाडी बसस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. नूतनीकरणामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

सोलापूर बसस्थानकात मोठे खड्डे पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत होते. नूतनीकरणात बसस्थानकातील रस्ते चांगले करण्यात येतील. सोलापूर बसस्थानकात दोन उपबसस्थानके आहेत. यात बार्शी कुर्डुवाडीसाठी स्वतंत्र अशी बसस्थानके आहेत. या उपस्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी असते. परंतु या बसस्थानकावर पत्राशेडशिवाय कोणतीच सुविधा नाही. तसेच, यातील बरेच पत्रे हे गळके आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना येथे उभारताही येत नाही. प्रवाशांच्या सुविधेकरिता बसस्थानकात सोयी उपलब्ध करण्यात याव्यात, तसेच दुरुस्तीही करण्यात यावी, असा प्रस्ताव सोलापूर एसटी विभागाने मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास पाठविला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला असून त्यात सुचविलेली कामे आता मार्गी लागणार आहेत.

ही होतील कामे
सोलापूरबसस्थानकात अंतर्गत रस्ते तयार करणे, पाण्याची टाकी बसविणे, जुनी मुतारी पाडून प्रवाशांसाठी नवीन बांधणे, बसस्थानकातील कुर्डुवाडी बार्शी उपबसस्थानकाचा विकास करणे आदी कामे केली जाणार आहेत.

उन्हाळ्यात धावणार ४३ जादा गाड्या
एसटीचागर्दीचा उन्हाळी हंगाम आता सुरू होत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागास ४३ गाड्या मंजूर करण्यात आल्या आहेत. ज्या मार्गावर प्रवाशांची जास्त गर्दी असते त्या मार्गावर या जादा गाड्या सोडण्यात येणार आहे. सोलापूर विभागाने पाठविलेल्या प्रस्तावास मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून मंजुरी मिळाली. एप्रिलपासून सोलापूर ते लातूर, सोलापूर ते पुणे, सोलापूर ते नाशिक, सोलापूर ते काेल्हापूर, सोलापूर ते नांदेड, सोलापूर ते जालना, सोलापूर ते बीड आदी ठिकाणी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी रा. ग. महाजन यांनी दिली.

निधी मंजूर झाला
बस स्थानकावरील प्रलंबित कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. ही कामे कधी सुरू होतील हे आताच सांगता येणार नाही. यामुळे प्रवासी सुविधेत वाढ होईल. श्रीनिवास जोशी, विभागनियंत्रक, एसटी महामंडळ, सोलापूर.
बातम्या आणखी आहेत...