आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडीतील चोराला अटक, तेरा तोळे दागिने केले जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- गुन्हेशाखा एमअायडीसी पोलिसांनी घरफोडीतील एका संशयित चोराला जेरबंद केले अाहे. अानंद ऊर्फ अऱ्या दौलत चव्हाण (वय ३२, रा. पारधी कॅम्प, सोलापूर) याला अटक करण्यात अाली अाहे. त्याच्याकडून पाच घरफोड्या उघडकीस अाल्या अाहेत. तेरा तोळे दागिने जप्त करण्यात अाल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर जिरगे यांनी दिली.

चव्हाण याचे अाणखी तीन साथीदार अाहेत. या सर्वांनी मिळून हत्तुरेवस्ती, अोंकार सोसायटी, विमानतळ परिसर, मजरेवाडी, शेळगी या भागात चोरी केल्याची कबुली दिली अाहे. विजापूर नाका हद्दीत दोन, एमअायडीसी हद्दीत दोन जोडभावी हद्दीत एक अशा एकूण पाच घरफोड्या उघडकीस अाल्या अाहेत. तेरा तोळे दागिने दीड किलो चांदी जप्त करण्यात अाली अाहे. मागील महिन्यात २९ मार्च रोजी दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यात ३५ तोळे दागिने जप्त करण्यात अाले होते. या सर्व घटना एकाच टोळीने केल्याची माहिती तपासात समोर अाली होती. ही कारवाई पीअाय जिरगे, सहायक निरीक्षक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय कोळेकर, अतुल न्यामने, संजय बायस, जयंत बाबरे, अनिल वळसंगे, दगडू राठोड, प्रशांत गाडे, मुन्ना शेख, सुभाष पवार, मंजुनाथ मुत्तनवार, राकेश पाटील, धनंजय बाबर, सागर सरतापे, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, शिवानंद भिमदे, वसंत माने, निंबाळकर, ढेकणे या पथकाने केली.