आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचे ७० लाख रुपये चाेरीचा बनाव रचणारा मॅनेजर अटकेत; पंढरपूर पाेलिसांकडून भंडाफाेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
खर्डी (जि. साेलापूर)- बँक ऑफ महाराष्ट्र सांगोला शाखेचे व्यवस्थापक एटीएम व्हॅनमधून ७० लाख रुपये घेऊन जात असताना अज्ञात अाराेपींनी गाडी राेखून ही संपूर्ण रक्कम लंपास केल्याचा गुन्हा बुधवारी पाेलिसांत दाखल झाला हाेता. या प्रकरणाचा २४ तासांत तपास लावून सत्य उजेडात अाणण्यात पाेलिसांना यश अाले असून संबंधित बँकेच्या  फिर्यादी व्यवस्थापकानेच हा बनाव रचल्याचे समाेर अाले अाहे. याप्रकरणी गुरुवारी अाराेपी व्यवस्थापक अमोल भोसले व त्याचा साथीदार भाऊसाहेब कोळेकर यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून ३१ लाख रुपये हस्तगत करण्यात अाले अाहेत.  

सांगोला - पंढरपूर रस्त्यावर खर्डी शिवाराजवळ पैसे घेऊन जात असलेली व्हॅन अडवून अज्ञातांनी ७० लाख रुपये चाेरून नेल्याची तक्रार भाेसले यांनी केली हाेती. चाेरट्यांनी डाेळ्यात मिरचीची पूड टाकून गाडीच्या खिडकीची काच फाेडून रक्कम लांबवल्याचे फिर्यादीत म्हटले हाेते.  या प्रकरणात पाेलिसांना सुरुवातीपासूनच फिर्यादीवर संशय हाेता. पाेलिसांनी सांगोला रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता  शिरभावीकडे जाणाऱ्या आडमार्गाचा वापर करून आरोपीने पलायन केल्याचे निष्पन्न झाले.  त्यावर सर्व चौकात नाकेबंदी करून पाेलिसांनी मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे जीपमधून ३१ लाख रुपये नेणाऱ्या भाऊसाहेब कोळेकर याला अटक केली. या जीपमधीलच नवनाथ मासाळ, बंडू मासाळ, शंकेशवर मासाळ (सर्व रा. गोणेवाडी, ता. मंगळवेढा) हेही जात होते. त्यांनाही चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात अाले अाहे. या कटामध्ये आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता अाहे. 
 
यांचीही चौकशी सुरू
जीप मधून नवनाथ मासाळ, बंडू मासाळ, शंकेशवर मासाळ (सर्व रा गोणेवाडी ता मंगळवेढा) हेही जात होते, मात्र त्यांना तपासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या कटामध्ये आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता असून लवकरच माहिती समोर येईल असे श्री पिंगळे म्हणाले.
 
कर्जबाजारी मॅनेजर  
बँक ऑफ महाराष्ट्रचा  व्यवस्थापक अमोल भोसले हा कर्जबाजारी झाला होता.  सांगोल्याला येण्याआधी ताे मंगळवेढा तालुक्यातील नदेश्वर शाखेत होता. त्या वेळी त्याची ओळख शेजारील गावातील काही तरुणांशी झाली होती. त्यांच्या मदतीनेच भाेसलेने ही लुटीची याेजना अाखली. एखाद्या चित्रपटातील कथेला शाेभेल असे नाट्य भाेसलेने रचले. साथीदारांच्या मदतीने गाडीतील बँकेचे पैसे पळवले व नंतर चाेरीचा बनाव केला. 
 
 
काय घ्यावी आता दखल 
आजही अनेक पतसंस्थेच्या कार्यालय, बँकेतून आजही आशा प्रकारे खासगी गाड्या भाडे तत्वाने घेऊन त्यातुन रक्कम ने आण केली जाते पण किती रकमेला कोणते वाहन आणि बंदोबस्त याबाबत बँकांचे नियमावली असते पण बँकांनी आता सुरक्षा रक्षक यांची मदत घ्यावी व जनतेचा पैसे जपावेत अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.  

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...