आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजापूर रोडवरील एकाच इमारतीतील दोन घरात चोरी, 6 लाखांचा एेवज गेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विजापूर रोडवरील निर्मिती विहारजवळील वैष्णव वास्तू अपार्टमेंटमध्ये राहणारे रेल्वे विभागातील अधिकारी कोट्टरू व्यंकटलाल यांच्या घरी चोरी झाली. 
 
शनिवारी रात्री साडेअाठच्या सुमाराला काही तासांसाठी परिवारासह घर बंद करून बाहेर गेल्यानंतर चोरांनी हात की सफाई करीत तब्बल १९ तोळे दागिने पळवले. याशिवाय त्यांच्या घरासमोर राहणारे चन्नकेशव रवींद्रनाथ तळवार यांच्या घरातून १६ हजारांचा एेवज चोरीस गेला. १९ तोळे दागिन्यांची चालू बाजारभावाप्रमाणे लाख रुपये किंमत होते. मागील पंधरवड्यात झालेल्या चोरीपैकी मोठी चोरी अाहे. 
 
व्यंकटलाल हे रेल्वेत अधिकारी अाहेत. ते परिवारासह रात्री बाहेर गेल्यानंतर चोरांनी मुख्य घराचा कडीकोयंडा उचकटून कपाटातील दागिने नेले. त्यांच्या शेजारी राहणारे तळवार यांच्या घरातून मोबाइल १६ हजार किमतीचे दागिने पैसे पळवले. काही वेळानंतर ते घरी अाल्यानंतर हा प्रकार कळला. रविवारी पोलिस उपायुक्त अपर्णा गीते यांनी पाहणी करून घटनेची माहिती घेतली. 
 
अलीकडे चोरीच्या घटना वाढल्या अाहेत. त्यांच्या मागावर अाहोत. पण, सरासरी प्रमाणात अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याच्या त्यांनी दावा केला. विजापूर नाका पोलिसांत तक्रार देण्यात अाली अाहे. पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांना विचारले असता, काही काळासाठी घर बंद करून गेल्यानंतर चोरांनी हा प्रकार केला अाहे. रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत अाहोत. 
 
महिन्यात ६५ तोळे चोरी 
मागील महिन्यात कर्णिकनगराजवळ डाॅ. पाटील यांच्या घरातून १५ तर पद्मनगरातील टाॅवेल व्यापारी यांच्या घरातून २६ तोळे तर रविवारी १९ तोळे अाणि मधला मारुती चौकात दीड तोळे तर डफरीन चौकात डाॅ. बचुवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावण्यात अाले अाहे. असे एकूण ६५ तोळ्यांहून अधिक दागिने चोरीला गेले अाहेत. तपास मात्र शून्य अाहे. सातही पोलिस ठाण्याचे डीबी गुन्हे शाखा पथक निष्क्रिय आहेत. 
 
मधला मारुती : दागिने पळवले 
मधला मारुती परिसरात गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पिशवीतील दागिन्यांची पर्स चोरांनी पळवली. गोदावरी महादेव अर्जुन (रा. पुणे, सध्या- मुकुंदनगर) यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली अाहे. दीड तोळे दागिने, दहा हजाार रुपये मोबाइल असा एेवज त्यात होता. सौ. गोदावरी यांच्या माहेरी नातेवाईक वारल्यामुळे त्या सोलापुरात अाल्या होत्या. शनिवारी ही घटना सायंकाळी घडली. फौजदार सचिन खेडकर हे या प्रकरणाचा तपास करीत अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...