आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाटला साडी सेंटर चोरीतील धागेदोरे आले पोलिसांच्या हाती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- भवानी पेठेतील चाटला पैठणी साडी दुकानात शनिवारी साडे अाठ लाखांची चोरी झाली. गुन्हे शाखा आणि जोडभावी पेठ पोलिसांनी संयुक्तपणे याचा तपास सुरू केला आहे. रविवारी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले अाहेत. लवकरच या गुन्ह्याची उकल होईल, असे संकेत पोलिसांनी दिले. 


लक्ष्मीकांत व्यंकटेश चाटला (रा. भवानीपेठ) यांनी जोडभावी पेठ पोलिसात तक्रार दिली अाहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमाराला दुकान उघडताना चोरीचा प्रकार समोर अाला. दुकानात जमा झालेले सात लाख ८२ हजार रुपये तीन तोळे दागिने चोरीस गेले. मुख्य रस्त्यालगत हे दुकान अाहे. तिसऱ्या मजल्यावर चढून जिन्यातून दुकानात खाली येऊन चोरट्याने तिजोरीतील पैसे पळवले. तपासासाठी विशेष पथके कार्यरत होते. पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांना विचारले असता, काही धागेदोरे मिळत अाहेत, दोन दिवसात उलगडा होण्याची शक्यता अाहे असे सांगितले. 


सुरक्षा यंत्रणाच कार्यान्वित नाही 
चाटला पैठणी हे मोठे दुकान. सीसीटीव्ही अाहेत पण बंद अवस्थेत. दुकानाच्या चारही बाजूला सीसीटीव्ही नाही. तिजोरीला सायरनही नाही. सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित राहिली असती तर कदाचित घटना टळली असती. 


चोरीच्या घटना वाढताहेत 
मागीलरविवारी रेल्वे लाइन भाागत राहणारे माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या घरातून ३३ तोळे दागिने चोरीस गेले. जुळे सोलापुरात सलग पाच-सहा दिवसांपासून पाच ठिकाणी चोऱ्या झाल्या. सुमारे दहा तोळेहून अधिक दागिने गेले अाहेत. अाठ दिवसांचा विचार केल्यास पन्नास तोळे दागिने, दहा लाख रुपये असा एेवज गेला अाहे. तपास एकाही घटनेचा नाही. फक्त जोडबसवण्णा चौकातील अकरा तोळे दागिन्यांची चोरी उघडकीस अाली.

बातम्या आणखी आहेत...