आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहाऱ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; अडीच लाखाचा ऐवज लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा- घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मध्यरात्री शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाख ४५ हजार रुपयांचे सोने, चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. ही घटना सोमवारी (दि.२०) मध्यरात्री घडली. काही दिवसापूर्वी शहरातील महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या घरी चोरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी मध्यरात्री घटना घडली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील व्यापारी मकबूल बागवान पत्नीच्या उपचारासाठी हैदराबाद येथे गेले होते. त्यामुळे त्यांच्या घरात रात्री कुणीही नव्हते. त्यात सोमवारी मध्यरात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरासमोरील शटरचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील मंगळसूत्र, तोळे सोन्याचा हार, अंगठ्या, ५० तोळे चांदी, बोरमाळ, झुमके असा एकूण लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पेरणीचे दिवस असल्याने मकबूल बागवान यांनी बाहेरील दुकानाच्या किल्ल्या भाऊ महेबूब बागवान यांच्याकडे ठेवल्या होत्या. मकबूल बागवान यांचा गडी मुजीब मुल्ला पेरणीसाठी बियाणे नेण्यासाठी महेबूब बागवान यांच्याकडून चावी घेऊन शटर उघडण्यासाठी गेले असता, कुलूप तोडलेले निदर्शनास आले. महेबूब बागवान यांनी दिलेल्या माहितीवरून लोहारा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक व्ही. जी. कासले बिट अमलदार सांगवे, पोलिस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, नागनाथ वाघमारे यांनी पंचनामा केला. त्यामुळे पुढील तपासासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. परंतु, चोरट्यांचे कोणतेही साहित्य मिळाले नाही.
बातम्या आणखी आहेत...