आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारमधून एक लाख ८० हजार लंपास, सोलापूरमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- अश्विनी हॉस्पिटलसमोर कारची काच फोडून लाख ८० हजार १०० रुपये चोराने लंपास केले. याची फिर्याद प्रसाद रवींद्र धुम्मा (वय २०, रा. होटगी रस्ता) यांनी दिली आहे.

प्रसाद यांच्या वडिलांनी एप्रिल रोजी दुपारी अश्विनी हॉस्पिटल प्रवेश द्वारासमोर मोकळ्या जागेत कार (एमएच १३, एसी ५५१९) लावली होती. कारच्या मागील दरवाज्याची काच फोडून अज्ञात चोराने सीटवर ठेवलेली पैशाची बॅग चोरून नेली. यामध्ये लाख ८० हजार १०० रुपये होते. सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कुणाच्याच नजरेस दिसले नाही?
अश्विनी हॉस्पिटल समोर दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. रात्री वॉचमन, रिक्षाचालक आदी असतात. अशा परिस्थितीत कारची काच फोडून आतील बॅग चोरून नेईपर्यंत कोणाची नजर कशी पडली नाही. समोरच पोलिस चौकी आहे. काच फोडताना आवाज होणारच, मग भरदुपारी हा प्रकार झाला, ते कोण पाहिले कसे नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.