आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या घरी गेले अन्‌ घरात चोरी झाली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भवानीपेठ पारस अपाॅर्टमेंटमध्ये वास्तव्यास असलेल्या धवल शहा यांच्या घरात चोरी झाली. सोमवारी सकाळी हे उघडकीला अाले असून शहा यांनी जोडभावी पोलिसात फिर्याद दिली अाहे. शनिवारी रात्री ते भावाकडे जेवणास गेले होते. तेथेच मुक्काम केला. या वेळी चोरांनी कुलूप कोयंडा उ़चकटून कपाटातील १५ हजार रुपये रोख, मोत्याचे कंगण हार, सोन्याचे मणिमंगळसूत्र, कानातील फुले असा पन्नास हजारांचा एेवज चोरीला गेला अाहे. शहा हे सकाळी घरी अाल्यानंतर त्यांना प्रकार कळला.

रेल्वेलाइन भागात ५० हजारांची घरफोडी
रेल्वेलाइन भागात राहणारे राहुल मंठाळकर यांच्या घरात ५० हजारांची चोरी झाली. यात एक तोळे सोन्याचे नेकलेस, १५ हजार रुपये असा एेवज गेला अाहे. शनिवारी ते घर बंद करून पुण्याला गेले असता रविवारी पहाटे घर फोडण्यात अाले. कपाटात ठेवलेले दागिने पैसे चोरीला गेले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...