आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचे जार देणाऱ्याने ७५ हजार लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- पाण्याची जार घेऊन घरात येणाऱ्याने ७५ हजार ५०० रुपये लांबवल्याची घटना बुधवारी सायंकाळी आरपीएफ लाइनमध्ये घडली. यातील संशयित मारुती सुखदेव गुंड (वय ४०, रा. उळे, ता. दक्षिण सोलापूर) याला सदर बझार पोलिसांनी अटक केली.

अंजली नारायण पोफळे (वय ३८, रा. आरपीएफ लाइन) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले, की बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ‘जलधारा’ पाण्याची जार घेऊन संशयित आरोपी गुंड घरात आला. हॉलमध्ये टीव्हीसमोरील टेबलावर एका कॅरिबॅगमध्ये रोख रक्कम ठेवलेली होती. पाण्याचे जार ठेवून गुंड याने कॅरिबॅगच लांबवली. त्यात ७५ हजार ५०० रुपये ठेवलेले होते. ते त्याने नेले, असे फिर्यादेत म्हटले आहे. शुद्ध पाण्यासाठी पोफळे यांनी जार मागवली होती. त्याच्या बदल्यात त्यांना ७५ हजार ५०० रुपयांचा फटका बसला. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल वाघमारे अधिक तपास करत आहेत.