सोलापूर - दरोडेखोर टोळीच्या प्रमुखास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. लाड्या राम्या भोसले (वय ३५, रा. जामगाव, मोहोळ) असे त्याचे नाव आहे. तीन मोबाइल, अडीच तोळे दागिने, तीन दुचाकी, १४० किलो गहू असा एेवज जप्त करण्यात अाल्याची माहिती पोलिस अायुक्त महादेव तांबडे यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
या टोळीतील तिघांना यापूर्वीच अटक झालेली आहे. भोसले याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली अाहे. टोळीत अाणखी पाचजणांचा समावेश अाहे. ते टेहळणी करून मंद्रूप, वळसंग, अककलकोट, जत, उमदी (सांगली) या भागात दरोडे टाकले अाहेत. चोरी करून मंद्रूपमार्गे जामगाव येथे जात. जत परिसरातील काहीजणांचा यात समावेश अाहेे. भोसले याने दोन दुचाकी जत, उमदी येथून चोरल्या अाहेत.
पथकअसे : पोलिसउपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक अायुक्त शर्मिष्ठा घारगे, निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय कोळेकर यांच्यासह अनिल वळसंगे, संजय पवार, जयंत चवरे, दगडू राठोड, संजय बायस, सुभाष पवार, अप्पा पवार, राकेश पाटील, जयसिंग भोई, मंगेश भुसारे, नंदकुमार गायकवाड, संतोष फुटाणे, वसंत माने, उमेश सावंत, निंबाळकर, काकडे, राठोड, पीजरादे.