आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरी क्लब आॅफ नॉर्थतर्फे अंध विद्यार्थ्यांंसाठी ब्रेल लायब्ररी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर - रोटरीक्लब सोलापूर नॉर्थ तर्फे अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लायब्ररी उपलब्ध करून दिली असून त्या ग्रंथालयामध्ये ५० हजार रुपयांची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अभ्यासक्रमाबरोबर इतर घटना विषयाचे ज्ञान अवगत असणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रंथालयामध्ये क्रमिक इतर विषयांचा समावेश आहे.
डोळस व्यक्तींसाठी ग्रंथालय वाचनालये आहेत. परंतु दृष्टी नसलेल्या व्यक्तींना वाचण्यासाठी पुस्तके नसतात. ही बाब दूर करण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे. यासाठी रोटरी नॉर्थ सोलापूरतर्फे भैरूरतन अंध शाळेत आंतरराष्ट्रीय साक्षर दिनाचे औचित्य साधून ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या लायब्ररीचे उद््घाटन माजी प्रांतपाल झुबीन अमारिया यांच्या हस्ते करण्यात आले. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी ब्रेल लिपीतील अंदाजे ५० हजारपेक्षा अधिक मूल्यांची विविध पुस्तके देणगी स्वरूपात मिळविण्यात आली आहेत. ही पुस्तके मिळाल्याने अंध विद्यार्थी विविध विषय माहितीची पुस्तके वाचून ज्ञानार्जन करू शकतील. या प्रसंगी अध्यक्ष सुनील वैद्य, रवींद्र फताटे, राजगोपाल झंवर, डॉ. सिध्देश्वर वाले, सचिन रोटे, श्रीशैल लातुरे, प्रकाश दर्शनाळे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल
^डोळस विद्यार्थी ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तक अथवा पेपर वाचू शकतात. परंतु दृष्टीबाधित विद्यार्थी वाचू शकत नाही. तरी त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी क्रमिक बरोबर इतर विषयांचे ज्ञान मिळावे यासाठी शाळेस पुस्तके भेट दिली आहेत. या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल.'' डॉ.सुनील वैद्य, अध्यक्ष, रोटरी क्लब आॅफ सोलापूर नॉर्थ
बातम्या आणखी आहेत...