आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहमार्ग बंद न ठेवता होतात रुळाच्या देखभालीची कामे, प्रवाशांचा जीव राहतो कायम टांगणीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मुझफ्फरनगरच्या रेल्वे अपघातानंतर शनिवारी देशात वेगवेगळ्या ठिकाणी चार रेल्वे अपघात झाले. यात दोन प्रवासी गाड्यांचा, तर दोन मालगाड्यांचा समावेश होता. रुळांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष, हे यामागचे प्रमुख कारण. इंजिनिअरिंग विभागाकडे रुळांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. इंजिनिअरिंग विभागाकडून रुळांच्या देखभालीसाठी ब्लॉकची (मार्ग थोडावेळ बंद ठेवण्याची) मागणी केली जाते. मात्र, ब्लॉक दिला तर वेळापत्रक कोलमडेल या भीतीने ऑपरेटिंग विभागाकडून विरोध होतो. परिणामी आज देशात रुळांची कामे ब्लॉक न घेताच केली जातात. १० पैकी कामे परवानगी न घेताच केली जात आहेत. मुझफ्फरनगरच्या अपघातानंतरदेखील देशातील सर्वच विभागांत आजही हे सुरूच आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाची जोखीम वाढली आहे. प्रत्येक विभागातून दर महिन्याला इंजिनिअरिंग विभाग किमान ८० ते १०० वेळा ब्लॉकची मागणी करतो. मात्र, २० ते ३० टक्के वेळाच मंजुरी दिली जाते. 

ही वेळ का आली
देशातदररोज सुमारे १८ हजार रेल्वे धावतात. स्वातंत्र्यानंतर केवळ ३५०० किमीचे रुळांचे जाळे वाढले आहे. गाड्या वाढल्या त्या तुलनेत रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण झाले नाही. एका मार्गावरून दर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने एक तरी रेल्वे धावते. या ताणामुळे रुळांचे आयुर्मान कमी होते. रुळांच्या देखभालीसाठी ब्लॉक दिला तर वेळापत्रक बिघडते, तर दुसरीकडे प्रवाशांची सुरक्षितता, अशा कचाट्यात रेल्वेचा प्रवास सुरू आहे. 

ब्लॉकचे वेळापत्रक हवे 
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत ब्लॉक घेताच परस्परच रेल्वेची कामे केली जातात. आजही हीच परिस्थिती कायम आहे. ज्या प्रमाणात रेल्वेगाड्यांची संख्या वाढत गेली त्या प्रमाणात रुळांचा विस्तार वाढला नाही. परिणामी जो मार्ग उपलब्ध आहे त्याच मार्गावरून गाडी पळवली जाते. पण मार्गाच्या देखभालीसाठी वेळच नसल्याने अपघातांची संख्या वाढत आहे. यासाठी ब्लॉकसाठीचे वेळापत्रक बनवणे गरजेचे आहे. 
- सुरेशत्रिपाठी, रेल्वे तज्ज्ञ, कल्याण. 

असे होते हे काम, दर्जाकडे दुर्लक्ष 
कामासब्लॉक मिळाला नाही तर पीडब्ल्यूआय गँगसमवेत त्या ठिकाणी येतो. व्यवस्थापकांशी बोलून रेल्वेस किती वेळ लागेल हा अंदाज घेतो. कामाचे स्वरूप गाडीची वेळ ही सांगड घालून ५-१० मिनिटांत काम होणार असेल तर तो ही माहिती नियंत्रण कक्षाला देता थेट कामास सुरुवात करतो. हे प्रयत्न कधी यशस्वी होतात, कधी फसतात. मुझफ्फरनगरमध्ये असा प्रयत्न फसला अनेकांचे प्राण गेले. 
बातम्या आणखी आहेत...