सोलापूर- कुकरेजा एजन्सी होलसेल कापड दुकानातून साडेतीन लाख रुपये चोरांनी पळविले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. हितेश कुकरेजा (रा. गुरुनानक नगर, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. दुकानाचे शटर उचकटून कपाटातील पैसे नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चोरीचा प्रयत्न
मुरारजी पेठेत सचिन ठोकळ यांच्या कारची काच तोडून आतील साहित्य चोरण्याचा प्रयत्न झाला. फौजदार चावडी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. कारमधून टेप, एसी पॅनल चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे. कारचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.