आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षणहक्क कायद्यानुसार वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०१६ -१७ पासून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी तालुक्यातील सर्व सबंधित अधिकाऱ्यांची मार्च रोजी शिक्षण विभागात बैठक होणार आहे. त्यानंतर लवकरच प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली जामदार यांनी दिली.
२०१६-१७ मध्ये प्रवेश घेण्यासाठी पहिल्या टप्यात शहर तालुक्यात २५ टक्के प्रवेशाची आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात येईल. त्यानंतर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. शहर जिल्ह्यातील विनाअनुदानित, खासगी प्राथमिक, कायम विनाअनुदानित, स्वंयअर्थसहायता इत्यादी शाळामंध्ये आरटीईनुसार प्रक्रिया होईल. प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी पालकांनी आवश्यक ती कागदपत्रे तयार ठेवावीत. वेळापत्रक जाहीर होताच जवळच्या शाळेतील मदत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विस्तार अधिकारी बापू जमादार यांनी केले.

आवश्यक कागदपत्रे : रहिवासीपुरावा - आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, वीज बिल, वाहन परवाना यापैकी, जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला पुरावा, बालकाचे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकारातील फोटो.