आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीई प्रवेशासाठी काढली बालकांच्या हस्ते आरक्षण सोडत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अार्थिकदुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये काढण्यात आली. लॉटरीद्वारे निघालेली आकडेवारी राष्ट्रीय माहिती यंत्रणा (एनआयसी) यांच्याकडे पाठवण्यात आली असून, मंगळवारी सायंकाळपर्यंत जाहीर होतील असे विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांनी सांगितले. 
 
खासगी प्राथमिक विनाअनुदानित कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये वंचित दुर्बल घटकांसाठी २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रिया राबवली जात अाहे. शहरातील २० ग्रामीण भागातील ३०७ शाळांचा समावेश आहे.
 
१५ मार्चदरम्यान पालकांनी पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये विचार केला जाणार नाही. निवड यादी मंगळवारी सायंकाळपर्यंत student.maharashtra.gov.in या वेबसाइटवर पाहण्यास मिळेल. पालकांना नोंदणी केलेल्या मोबाइलवर एसएमएसद्वारे सुचित करण्यात येईल. 
बातम्या आणखी आहेत...