आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारटीईची दुसरी सोडत, 214 विद्यार्थ्यांना संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशासाठी काढलेल्या दुसऱ्या सोडतीतून २१४ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरवले. पूर्व प्राथमिकसाठी ४४ प्राथमिकसाठी १७० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. जिल्ह्यात साडेतीन हजारांहूून अधिक जागा असून, केवळ १३०० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. आरटीई प्रवेशास हवा तेवढा नाही.
 
दुसरी सोडत उत्तर सोलापूर पंचायत समिती येथे शुक्रवारी झाली. जिल्ह्यात पूर्व प्राथमिक प्राथमिकच्या हजार ५८६ जागा आहेत. जिल्ह्यातून २०६९ अर्ज पात्र झाले. पहिल्या सोडतीमध्ये १६७६ विद्यार्थ्यांची निवड झालेली होती. त्यापैकी १०९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रतीक्षा यादीनुसार प्रवेशासाठी दुसरी सोडत काढली. त्यातही २१४ जणांची निवड झाली. दुसऱ्या सोडतीत पात्र ठरलेल्या मुलांचा ते १५ एप्रिलदरम्यान प्रवेश घ्यावा लागणार आहे. या वेळी गटशिक्षणाधिकारी राजकुमार नागणसुरे, मल्हारी बनसोडे, प्रकाश यादव, स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, बंडू शिंदे, इम्तियाज चंदरकी, जयंत पाटील, प्रभावती वईटला, अमर शंकू, अमोल गायकवाड आदींसह मुख्याध्यापक पालक उपस्थित होते.
 
रिक्त उपलब्धजागांवर प्रवेशासाठी दुसरी सोडत घेतली. ज्या ठिकाणी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आले, त्या शाळेत सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. ज्या शाळेत प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज अाले तेथे, विना सोडत प्रवेश दिला. पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.
- बापूराव जमादार, आरटीई समन्वयक
बातम्या आणखी आहेत...