आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RTO Officr Waiting Not On Month: Minister Deshmukh

आरटीओचे स्कॅनिंग : वेटिंग महिन्यावर जाऊ देणार नाही : पालकमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ऑनलाइनअपइंटमेंट मिळवण्यासाठी आता तीन महिने वेटिंग करावे लागते. यापुढे ऑनलाइन वेटिंग महिन्याच्या वर जाऊ देणार नाही. त्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना कराव्यात. तसेच सामान्य वाहनधारकांनी कोणत्याही परिस्थितीत एजंटांकडे जाता कामा नये, यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
‘दिव्य मराठी’ने ‘आरटीओ स्कॅनिंग'चे या मालिकेअंतर्गत सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू असलेल्या गैरकारभारावर प्रकाश टाकला. त्याची दखल परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी घेतली आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना तत्काळ सूचना केल्या आहेत. याशिवाय ऑनलाइन फॉर्म भरण्याची साेय आरटीओ कार्यालयात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रश्न - मॅन्युअल पद्धत पुन्हा सुरू करणार का?
पालकमंत्री- मॅन्युअल पद्धतीत वाहन परवाने अधिक देण्यात येत असले तरीही ही पद्धत आता पुन्हा लागू होणार नाही. आरटीओतील एजंटांना आळा घालण्यासाठी तसेच लोकांना कमी दरात वाहन परवाना मिळावा म्हणून ऑनलाइन अपॉइंटमेंट सुरू करण्यात आली. या यंत्रणेत काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातील.

प्रश्न-ऑनलाइन वेटिंग कमी करण्यासाठी काय उपाययोजना?
पालकमंत्री-ऑनलाइनअपॉइंटमेंटच्या कोट्यात वाढ करण्यासाठी सांगितले आहे. अपॉइंटमेंट अगेस्ट कॅन्सलेशन ही पद्धत सोमवारपासून लागू होणार आहे. याचा वाहनधारकांना नक्कीच फायदा होईल. शिवाय वेटिंग कमी होण्यास मदत मिळेल. महत्त्वाचे म्हणजे सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू असणार आहे. एक महिन्याच्या पुढे वेटिंग जाऊ देऊ नका, अशा सूचना आरटीओंना करण्यात आल्या आहेत.

प्रश्न- एजंटांना टाळावे असे म्हणता पण फॉर्म भरण्यासाठीच एजंटांकडे जावे लागते?
पालकमंत्री- होय बरोबर आहे तुमचे. पण, आता वाहनधारकांना ऑनलाइन फाॅर्म भरण्यासाठी एजंटाकडे जावे लागू नये म्हणून आरटीओ कार्यालयातच फॉर्म भरण्यासाठी चार संगणक संचाची व्यवस्था करण्यात येईल. या ठिकाणीच वाहनधारकांचे फॉर्म भरले जातील. फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मोफत फॉर्म भरून देण्यात येईल.

प्रश्न- ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी विन्डोज ११ का, दुसरे सॉफ्टवेअर का नाही?
पालकमंत्री- याबाबत मला अधिक माहीत नाही. मात्र विन्डोज ११ चा का अट्टहास का याबाबत माहिती घेतली जाईल. दुसऱ्या सॉफ्टवेअर संदर्भात मी परिवहनमंत्र्यांशी लवकरच पत्रव्यवहार करणार आहे.