आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुद्र फायनान्सवर गुन्हा दाखल करण्याचे उपनिबंधकांचे आदेश,सरकारी वकिलांकडून मागितला अभिप्राय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या रुद्र फायनान्सच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे आदेश सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड यांनी दिले. त्यावर शहर उपनिबंधक प्रियांका गाडीलकर यांनी सरकारी वकिलांचा अभिप्राय मागितला. अनुकूल अभिप्राय मिळताच पुढील कारवाई होईल, असे लावंड यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
बलिदान चौकातील या फायनान्समध्ये गुंतवणूकदारांच्या मोठ्या प्रमाणावर रकमा अडकल्या आहेत. जानेवारीपासून गंुंतवणूकदारांनी तगादा लावला. पण त्यांचे पैसे मिळत नसल्याने बुधवारी (ता. २०) संतप्त जमावाने फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड केली.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा प्रकार थांबला. त्यानंतर सहकार खातेही खडबडून जागे झाले. शहर उपनिबंधक कार्यालयात फायनान्सच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या. पण प्रत्यक्ष कारवाई काही झाली नव्हती. लावंड यांनी तातडीने गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यावरही सरकारी वकिलांचा अभिप्राय मागण्यात आला आहे. अभिप्राय आल्यानंतर पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

...तर सावकारी प्रतिबंधक कायद्याने होईल कारवाई
सरकारी वकिलांनी गुन्हे नोंदवण्यास अनुकूल अभिप्राय दिला तर सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार या फायनान्सच्या संचालकांवर कारवाई होईल. शिवाय गुंतवणूकदारांची फसवणूक म्हणूनही गुन्हा दाखल होईल. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण पाठवले तर महाराष्ट्र गुंतवणूकदार हितरक्षण कायद्याने (एमपीआयडी)ही कारवाई होऊ शकते. या कायद्यानुसार संघटित गुन्हेगारीसंदर्भातील कलम लागू होतात.

गुंतवणुकीवर टक्के व्याज
या फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यात येणाऱ्या रकमेवर टक्के व्याज देण्यात येते. त्यामुळे काही मध्यमवर्गीयांनी लाखो रुपये देऊन त्यावर दरमहा व्याज घ्यायचे. गुंतवणूक काही छोटी नसून ती लाख ते २५ लाख इतकी अाहे. डिसेंबर २०१५ अखेरपर्यंत सर्वांना व्यवस्थित व्याज मिळत गेले. त्यानंतर रक्कम मिळत नसल्याची बाब पुढे आली. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मात्र या प्रकरणाला तोंड फुटले.