आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार करणारे जिल्ह्यातील ७० वाहक कारवाईच्या कचाट्यातून होणार मुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - एसटीमहामंडळाच्या गाडीवर सेवा बजावत असताना अपहार करणाऱ्या जिल्ह्यातील ७० वाहकांना कारवाईच्या कचाट्यातून मुक्तता मिळणार आहे. तडजोडीची संधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध केल्याने वाहकांना अनेक दिवसांपासूनच्या मानसिक, आर्थिक ताणातून मूक्तता मिळणार आहे.
परिवहन महामंडळाच्या बसचे जाळे सर्वत्र पसरले आहे. महामंडळाला उत्पन्न मिळवून देण्यासाठी बसमधील वाहकांची मोठी भूमिका असते. यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र, काही वाहक या बाबींचा चांगलाच गैरफायदा घेतात. यामुळे मार्ग तपासणी पथक सुरक्षा - दक्षता खात्यामार्फत वाहकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जाते. रस्त्यावर कोठेही बस अडवून तपासणी केली जाते.

वाहकांकडे असलेली रक्कम, वाटप केलेले तिकीट, बसमधील प्रवासी या सर्व बाबींची कसून चौकशी केली जाते. महामंडळाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करून अपहार झाला असेल तर तीव्रतेनुसार विचार करून कारवाई केली जाते. दंड, बदली, निलंबन अशा प्रकारची कारवाई केली जाते. जिल्ह्यात असे कारवाई करण्यात आलेले अनेक वाहक आहेत. त्यांच्यावर प्रस्तावित असलेल्या कारवाईच्या अनुषंगाने त्यांना मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांची सुनावणी घेऊन कारवाई केली जाते. त्यांना सातत्याने चौकशी कर्मचाऱ्यांकडे जावे लागते. अशा वाहकांना या सर्व चक्रातून मुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने संधी उपलब्ध केली आहे. असे पात्र वाहक जिल्ह्यात ७० आहेत. त्यांना विभागीय कार्यालयाकडून तडजोडीसाठी पत्र पाठवण्यात आले आहेत. संबंधित वाहकाने तडजोडीचा अर्ज सादर केल्यानंतर त्याला ठरवून देण्यात आलेल्या निकषाप्रमाणे कारवाईत सवलत देऊन दंड तडजोडीची कारवाई करून चौकशीच्या फेऱ्यातून मुक्त करण्यात येणार आहे. कारवाईतून मुक्त झालेल्या वाहकाच्या पुढील कोणत्याही फायद्यावर परिणाम होणार नाही. यामुळे त्याला मुक्तपणे सेवा बजावता येणार आहे. तडजोड झालेल्या वाहकाने पुन्हा गुन्हा केला तर त्याला तडजोडीची संधी असणार नाही.

संचालकांचा निर्णय
अपहार प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्याबाबत सुरक्षा दक्षता विभागाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि. एप्रिलला झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. यावेळी या प्रकरणात ठराव घेऊन तडजोडीची कारवाई सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. आता अश्विनी पौर्णिमेची सेवा संपल्यावर या प्रक्रिया वेग देण्यात येणार आहे.

कायम धोरण :परिवहन महामंडळाने तडजाेडीचे हे विशेष धोरण कायमस्वरुपी लागू केले आहे. मात्र, संबंधित वाहकांच्या बाबत निकष ठरवण्यात आले आहेत. तडजोड ठरवण्यासाठी विभागीय वाहतूक अधीक्षक, कर्मचारी वर्ग अधिकारी, लेखा अधिकारी कामगार अधिकाऱ्यांची संयुक्त जबाबदारी आहे. ते विभाग नियंत्रकांकडे मंजुरीसाठी प्रकरण दाखल करतील. सर्व कारवाईवर प्रादेशिक व्यवस्थापकांची नजर असणार आहे.

अधिकाऱ्यांनाही मिळणार सूट
वाहक, चालकांची तपासणी करताना त्यांचा गुन्हा लपवण्याचेही प्रकार होतात. यामुळे काही तपासणी पथकातील अधिकारी तसेच सुरक्षा दक्षता खात्यातील अधिकाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत. त्यांनाही या परिपत्रकाद्वारे तडजोड करता येणार आहे. त्यांच्यासाठी दंड बदलीची तरतूद आहे. मात्र, जिल्ह्यात असे कर्मचारी नाहीत.

अशी होणार तडजोड
तडजोड करताना अपहारीत रकमेपेक्षा ५०० ते ७५० पट रक्कम वसूल होणार. यासाेबत दुसऱ्या विभागात तसेच दूरच्या ठिकाणी बदली करण्याचे प्रावधान आहे. तसेच एक हजार ते १५ हजार रुपयांपासून थेट दंड वसूल करता येणार आहे. मात्र, यासंदर्भात कर्मचाऱ्याने न्यायालयाने दाद मागितलेली असल्यास प्रकरणे मागे घ्यावी लागणार आहेत.

यामध्ये नाही तडजोड
प्रवाशाला दिलेले तिकीट परत घेऊन पुन्हा त्याची विक्री करणे, अधिक प्रवास असेल तर कमी दराची तिकिटे देणे, सातत्याने अनियमितपणे तिकिटांची विक्री करणे. यासोबतच बेवारसपणे सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहकांना यामध्ये तडजाेड करता येणार नाही.

अशा अपहारांमध्ये होणार तडजोड
{प्रवाशांकडूनभाडे वसूल करून त्याला तिकीट देणे.
{प्रवासभाडे घेता तिकीटही देताच बसमध्ये बसवणे.
{तिकीट वाटपाच्या हिशेबापेक्षा कमी रक्कम असणे.
{सवलतीच्या पासची खातरजमा करता प्रवासाची मुभा.
{पदार्थांची पासवर वाहतूक करताना मर्यादा पाळणे.
{पेपर पार्सल, खवा, फुले यांची अनधिकृत वाहतूक.
{राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचारी विनातिकीट असणे.
{कौटुंबिक पासचा गैरवापर, प्रतिबंधात्मक सामानाची वाहतूक.
बातम्या आणखी आहेत...