सोलापूर- सेंटजोसेफ स्कूलने सेंट थॉमस स्कूलविरुद्ध पेनल्टी किकवर ३-० ने विजय मिळवला. त्यासह फ्लोरा करंडक शालेय १४ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
वालचंद शिक्षण समूहाच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १९ संघांनी भाग घेतला होता. यात बार्शी, मोहोळ अक्कलकोट येथील शाळांचा समावेश होता. स्पर्धेचे उद््घाटन माजी महापौर आरिफ शेख प्राध्यापक आर. एम सौदागर यांनी केले. पारितोषिके शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. डॉ. पुरणचंद्र पुंजाल, वैजनाथ कदम, गोविंद पवार आनंद चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आली. किरण चौगुले यांनी सूत्रसंचालन केलेे.
अंतिम सामन्यातील निर्धारित वेळेतील सामन्यात सेंट जोसेफची नवख्या सेंट थॉमस स्कूलने बचावात्मक खेळ करून चांगलीच दमछाक केली. आठव्या मिनिटाला सेंट जोसेफच्या ऋषिकेश वाघमारेने गोल करून खाते उघडले. मध्यंतरानंतर ४७ व्या मिनिटाला सेंट थॉमसच्या राहुल पवारने सुंदर फील्ड गोल करीत बरोबरी केली. पेनल्टी किकवर मात्र, सेंट जोसेफचा गोलरक्षक सुमेर औसेकरने एकही गोल होऊ दिला नाही. सेंट थॉमसच्या यश गाडेकर या गोलरक्षकला मात्र तीन गोल अडविता अाले नाहीत. हे गोल सेंट जोसेफच्या जावेद शेख, तरुण गुप्ता सौरव नागटिळक यांनी केले.
शालेय फुटबॉल स्पर्धेतील विजेता सेंट जोसेफचा संघ शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते प्रा. डॉ. पुरणचंद्र पुजाल यांच्या हस्ते फ्लोरा करंडक स्वीकारताना. यावेळी गोविंद पवार, वैजनाथ कदम, किरण चौगुले, आनंद चव्हाण आदी.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
गोलरक्षक: यश गाडेकर, संरक्षक : अजय अनुराग, उदयोन्मुख : विशाल बिराजदार, शुभम खानापुरे (सर्व सेंट थॉमस), मालिकावीर : सुमेर औसेकर, स्ट्रायकर : तरुण गुप्ता, मध्यरक्षक : सौरभ नागटिळक (सर्व सेंट जोसेफ).