आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला तो क्षण हाकेच्या अंतरावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर तालुक्यातील वाखरी पालखी तळावर संत तुकाराम महाराज पालखीच्या अश्वाचे दर्शन घेताना महिला. - Divya Marathi
पंढरपूर तालुक्यातील वाखरी पालखी तळावर संत तुकाराम महाराज पालखीच्या अश्वाचे दर्शन घेताना महिला.
तुकोबाराय पालखी मार्गावरून -
चंद्रभागास्नान। तुका मागे हेची दान।।
पंढरीचा आसमंत। विठ्ठलरूप झाला।।
वारकरीआनंदले आहेत. कारण त्यांचा लाडका विठ्ठल आता हाकेच्या अंतरावर आहे. मागील २१ दिवसांपासून तुकोबारायाच्या दिंडीतील एकमेकांचे सहकारी गुरूबंधू रविवारी विभक्त होणार होते. वाखरी मुक्कामावरून रविवारी दुपारी एकच्या सुमाराला तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ झाली. उभे रिंगण पादुका आरती (इसबावीजवळ) झाले. शनिवारी रात्री सर्वच पालख्या वाखरी तळावर आल्या आहेत. सर्व संतांचे दर्शन घेण्यासाठी वारकरी, भाविक आतुरले होते. सर्व संतांचे जाहले दर्शन, धन्य झालो पंढरीया, ‘पंढरीचा वारकरी वारी चुको दे हरी’ असा धावा करीत होते. पंढरीचा आसंमतच जणू आता विठ्ठलरूप झाला आहे. अवघ्या काही तासात पांडुरंगाचे दर्शन, कळस दर्शन आणि चंद्रभागा स्नान आहे. हा उत्साहच जणू चैतन्य मनाला स्फूर्ती देणारा आहे.

वारकरीच...
पंढरपूर समीप असलेल्या सर्वच मार्गावर फक्त वाहने आणि वारकरीच दिसत आहेत. उपरी फाटा ते वाखरी तळ, सातारा, अकलूज, सांगोला, सोलापूर या मार्गावरीही प्रचंड गर्दी पडलीय. वाहनांचा रांगा लागल्या आहेत. पोलिसांचे नियोजन असले तरी मोठ्या गर्दीचा भार पडला आहे. वारकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.
पालखी तळावरती प्रचंड धुळीचे लोट
पालखीतळावरती सर्व पालख्या आल्यामुळे वारकऱ्यांची गर्दी आहे. प्रचंड धुळीचे लोट उठत होते. अनेकांना त्रास जाणवत होता. तरीही याची तमा बाळगता वारकरी, भाविकांनी पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. विशेषत: माउली आणि तुकोबा, सोपानकाका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई यांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी दिसत होती.
तुकोबारायांच्या पादुकांना आज स्नान
सायंकाळीतुकोबारायांची पालखी पंढरीत आल्यानंतर तुकोबा मंदिरात विसावली. सोमवारी सकाळी नगरप्रदक्षिणा आहे. तसेच पादुकांना चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात येईल, असे या वेळी पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे महाराज यांनी सांगितले.