आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापुरात 10 लाख माेर्चेकऱ्यांचा हुंकार, मुंबईच्या वेशीवरही धडक, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजास आरक्षण व अॅट्रासिटीचा गैरवापर थांबवा, या प्रमुख मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात अाला. शिस्त अाणि नियोजनाचा अादर्श घालून देणाऱ्या या मोर्चात सुमारे दहा लाख लाेक सहभागी झाले हाेते. यात सुमारे दाेन लाखांहून अधिक महिलांचा समावेश हाेता. मोर्चाचे नेतृत्व सायली भोसले, प्रियंका डोंगरे, सायली बचुटे, ऐश्वर्या चव्हाण व स्वराली मुळे या तरूणींनी केले.

सकाळी ९ वाजता संभाजी राजे चौकात जिजाऊ वंदनाने या माेर्चास सुरूवात झाली. अत्यंत शिस्तबद्ध व नेटके नियोजनानुसार निघालेला मोर्चा दुपारी १२.३० वाजता होम मैदानावर पोहचला. या मैदानाची क्षमता फक्त दोन लाखाचीच असल्याने उर्वरित जनसमुदाय हा मोर्चाच्या मार्गावरच थांबविण्यात आला. दुपारी १.१० वाजता जिल्हाधिकारी रणजितकुमार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर दुपारी २ वाजता निवेदन वाचन, त्यानंतर उरी येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रगीताने माेर्चाचा समारोप करण्यात आला.

माेर्चाच्या निमित्ताने सकाळपासूनच शहरातील रस्त्यांवर भगवे झेंडे व महामूक मोर्चाचे स्टिकर लावलेले दुचाकी व चारचाकी वाहने धावत होती. सकाळपासूनच जिल्ह्यातून नागरिकांची गर्दी वाढत गेली. संयोजकांनी लोकप्रतिनिधींना मोर्चाच्या अग्रभागी राहू नका, अशी सूचना केल्याने जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनीही जुना पुना नाका चौकात ठिय्या मारला होता. मोर्चात महिला व युवतींचा मोठा सहभाग दिसून आला. अग्रभागी शिवरायांच्या पेहरावातील बालक लक्ष वेधून घेत होते.

२० किलाेमीटरपर्यंत रांग
साेलापुरातील होम मैदान ते संभाजी राजे चौक हे अंतर फक्त साडेतीन कि.मी. होते. मैदान व मोर्चाचा मार्गावर अलाेट गर्दी झाल्याने इतर मोर्चेकरी रस्त्यावरच थांबले. करमाळा व मोहोळ तालुक्यातील लाेकांना शहरातही येता आले नाही. वाहनांची संख्या वाढल्याने हजाराेे माेर्चेकऱ्यांनी शहरापासून २० किलोमीटरवर असलेल्या सावळेश्वर येथूनच पायी चालत येणे पसंत केले.

नेटके नियोजन
मोर्चा शिस्तबद्ध करण्यासाठी साेलापुरात सुमारे पाच हजार स्वयंसेवक तैनात होते. शिस्त बिघडू नये, ढकला-ढकली व चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी ५० जणांचे पथक कार्यरत होते. त्यांच्याकडे वाॅकीटाॅकीही होत्या. मोर्चा झाल्यानंतर होम मैदान व मोर्चा मार्गावर तातडीने स्वच्छता मोहिम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.
पुढील स्लाईडवर वाचा... मुंबईच्या वेशीवरही मराठा मोर्चाची धडक, मुंबईच्या वेशीवरही मराठा मोर्चाची धडक आणि क्लिक करुन बघा, नवी मुंबई व सोलापुरात निघालेल्या मोर्चाचे फोटो.....
बातम्या आणखी आहेत...