आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या पहिल्या टाऊन हॉल कार्यक्रमात सोलापूरचे साळुंखे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘मायगव्हर्नमेंट’मध्ये सतत नवनवीन कल्पना सुचविणाऱ्या देशात सुमारे पस्तीस लाख नागरिक होते. यातील निवडक म्हणजे दोन हजार जणांना दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत टाऊन हॉल कार्यक्रमात सहभागी होता आले. सोलापुरातून एकमेव सहभाग वालचंद आर्ट सायन्स महाविद्यालयाचे प्राध्यापक शेखर साळुंखे यांचा राहिला. टेक्नोक्रॅट सेलचे ते सक्रिय सदस्य आहेत.
चर्चासत्रात नरेंद्र मोदी यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांसमवेत संवाद कार्यक्रम शनिवारी झाला. वर्षभरात ज्या अभ्यासकांनी, नागरिकांनी विविध क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूचना दिल्या. त्या हजारोंमधील दोन हजार जणांचा यात सहभाग राहिला.

माय गव्हर्नमेंटचा पहिला वर्धापन दिन शनिवारी नवी दिल्लीत आयोजिला गेला. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत विविध ग्रुपबरोबर संवाद साधण्याची ही संधी होती. प्रा. साळुंखे हे विविध विद्यापीठे, इन्स्टिट्यूटस तसेच डिस्कशन्स लर्निंग या माध्यमातून २३ विविध पदव्या विविध पुरस्कार त्यांनी पटकाविले आहेत.

मोदींचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन
^शैक्षणिक विषयक आमूलाग्र बदलासाठी विविध स्तरांतील व्यवस्थेतील मूलभूत बदल अत्यंत बारकाव्याने मांडण्याची संधी पॅनेल डिस्कशनमध्ये मिळाली. सुरवातीला वित्तमंत्री अरुण जेटली तसेच विविध अधिकाऱ्यांबरोबर आपापले मुद्दे मांडण्याची संधी देण्यात आली. तथापि सर्व मुद्यांना स्पर्श करीत पंतप्रधान मोदीच्या मार्गदर्शन भाषणाने समारोप केला. प्रा.शेखर साळुंखे, वालचंद महाविद्यालय
बातम्या आणखी आहेत...