आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हाधिकाऱ्यांना हरित लवादाचे आदेश, यंत्राद्वारे वाळू उपसा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - नदीपात्रातून वाळू उपसा करताना यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. यामुळे परवानगी देताना पर्यावरणाच्या नियम अटीचा भंग होत आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यात किती जेसीबी आहेत, किती जेसीबी प्रत्यक्षात वापर केला जात आहे, अशा जेसीबी मालकांची संपूर्ण पत्त्यासह यादी सादर करावी, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायमूर्ती जावेद रहीम देवेंद्र कुमार अग्रवाल यांनी दिले. सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.
श्री. कदम यांनी सोलापूरसह संपूर्ण राज्यात वाळू उपसा करण्यास जेसीबी इतर यंत्राचा वापर केला जात आहे, यामुळे पर्यावरणाची हानी होत अाहे. यामुळे वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा करीत असल्याबाबतचे फोटो पाहून न्यायमूर्तींनी यंत्राच्याद्वारे होत असलेली वाळू उपसाची सत्यता पडताळणीसाठी तत्काळ समिती नियुक्तीचे आदेश दिले. याचा अहवाल आठ दिवसात सादर करावे, असेही नमूद केले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळही आता प्रतिवादी...
यंत्राद्वारे होत असलेल्या वाळू उपशासंबंधी कदम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवार (दि. १५) सुनावणी झाली. सुनावणीमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासही प्रतिवादी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता पुढील सुनावणीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळासही म्हणणे मांडावे लागणार आहे.

कारवाईच होत नाही...
^लवादाने १९ जानेवारीला सुनावणीत यंत्राद्वारे वाळू उपसा होत असलेल्या ठिकाणची जेसीबी इतर यंत्रे जप्त करावी, यंत्राद्वारे उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. आदेशाची अंमलबजावणी करावी. शिवाय दुष्काळ जाहीर झालेल्या गावातील वाळू उपसा तत्काळ बंद करावा.” प्रफुल्ल कदम, याचिकाकर्ते
जिल्ह्यातील जेसीबीची माहिती द्या
बातम्या आणखी आहेत...