आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू तस्करांनी महसूल पथकाला धमकावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोडनिंब, टेंभुर्णी - लऊळ(ता. माढा) येथे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अंगावर वाळू वाहतुकीचा ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास गारअकोले येथे अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करताना महसूल पथकाला कारमधून आलेल्या चार ते पाचजणांनी शिवीगाळ करत धमकावल्याचा प्रकार घडला. तसेच पथकाच्या सरकारी वाहनाची चावीही काढून घेण्यापर्यंत मजल मारली. याप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर चार वाहने जप्त केली आहेत. नीलेश मच्छिंद्र बोडके (वय ३३, पिंपरी बुद्रूक, ता. इंदापूर) गणेश मच्छिंद्र बिचकुले (वय २६, गारअकोले, ता. माढा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. या दोघांना माढा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी िदली. उर्वरितपान १४
भीमानदीपात्रात अवैध वाळू तस्करी सुरू असल्याची खबर तहसीलदार सदाशिव पडदुणे यांना िमळाली. त्यांच्या अादेशानुसार निवासी नायब तहसीलदार अर्जुन चव्हाण, नायब तहसीलदार मारुती मोरे, तलाठी पी. बी. तेरकर, अानंदा डोणे, पी. एस. जाधव, प्रभारी मंडल अधिकारी नागेश सोनवणे, पोलिस नाईक देवडकर यांच्या पथकाने गारअाकोले येथील बजरंग अाखाड्याजवळ भीमा नदीपात्रात गेले. तेथे जेसीबीच्या सहाय्याने वाहनांमध्ये (ट्रक क्र. एम एच १२ एच डी ९५२ ट्रॅक्टर क्र. एम एच ४२ एफ ३५९०) वाळू भरत असल्याचे दिसले. पथक त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर वाळू तस्कर पळून जाऊ लागले. पथकाने जेसीबीचालक बबलू वाघमोडे (रा. टाकळी टें., ता. माढा) ट्रकचालक गणेश बिचकुले या दोघांना पकडले तर ट्रॅक्टरचालक पळून गेला. कारवाई करून जप्त वाहनांसह पथक परतताना स्वामी समर्थ मंदिराजवळ एक कार ( एम एच ४२ के ५५४९) ही सरकारी वाहनासमोर आडवी लावण्यात आली. पथकाची जीप थांबल्यानंतर कारमधून उतरलेल्या अज्ञात चार ते पाचजणांनी शिवीगाळ करत धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. तसेच या गर्दीत सरकारी वाहनाची चावी काढून घेतली. पथकाने कारवाईसाठी कार ताब्यात घेतल्यानंतर त्या चार ते पाचजणांनी अामच्या गाडीतून एक लाख २५ हजार रुपये चोरीला गेल्याचे सांगत पोलिसांत फिर्याद देऊ आणि तुम्हाला बघून घेऊ अशी दमदाटी केली.
दरम्यान, वाद वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर पथकाने फौजदार संदीप जोरे यांच्याशी संपर्क साधून अतिरिक्त पोलिस मागवले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन बबलू वाघमोडे हा पळून गेला. यावेळी पोलिस पथकातील अधिकाऱ्यांनी जेसीबी मालक नीलेश बोडके याला पकडून ठेवले. नंतर नीलेश गणेश बिचकुले यास पाेलिसांच्या ताब्यात दिले. तसेच कार, जेसीबी, ट्रक ट्रॅक्टर आणि ५० हजार रुपये किमतीचा वाळूसाठा जप्त केला. याप्रकरणी मंडल अधिकारी नागेश सोनवणे यांनी फिर्याद दिली.