आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुधनीत भाजपने इतिहास घडवला, सांगोल्यात आघाडीची सत्ता, महायुतीचा अध्यक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीने सत्ता आबाधित राखण्यात यश मिळवले असले तरी नगराध्यक्ष मात्र महायुतीचा निवडून आला आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या यंदाच्या निवडणुकीत आघाडीने ११ जागा तर महायुतीने ८ जागांवर विजय मिळवला. एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे.

भाजप, शिवसेना, रासप, आरपीआय व स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राणी आनंदा माने यांनी अटीतटीच्या निवडणुकीत २९०१ मतांनी विजय मिळवला.त्यांना १० हजार ९२९ मते मिळाली. नगरविकास आघाडीच्या छाया पाटील यांना ८ हजार २८ मते पडली. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळंुखे यांच्या आघाडीला यंदा भाजप शिवसेना, रिपाइं, रासप व स्वाभिमानी यांच्या महायुतीने आव्हाने दिले होते. महायुतीला ८ जागांवर विजय मिळवला. तर आघाडीतील राष्ट्रवादीला ६ ,शेकाप ४, काँग्रेस 1 अशा जागा मिळाल्या आहेत. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदी माने व पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळाली. इतर चार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. नगराध्यक्ष राणी माने यांचे पती आनंद माने हेही निवडणून आले आहेत. आनंद माने व राणी माने हे पती-पत्नी नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग 1 अ - स्वाती मस्के (महायुती)-812 , सुरेखा मदने (शेकाप)-699 , आनंदा माने (महायुती)-847, अजितकुमार गावडे (शेकाप)-580 , प्रभाग 2- सुनीता खडतरे (राष्ट्रवादी)885 , लीलावती खाडे 821, सतीश सावंत (अपक्ष)719, अवी देशमुख (काँग्रेस)-556, प्रभाग 3 -अप्सरा ठोकळे(महायुती)- 997 , बेबी साठे(राष्ट्रवादी)- 609 , प्रशांत धनवजीर (महायुती)-1225 , बाळासाहेब बनसोडे (शेकाप)-624 , प्रभाग 4 -छाया मेटकरी (महायुती)-1560 , सुवर्णा जानकर (शेकाप)- 1068, अस्मीर तांबोळी (महायुती)-1229, मकरंद अंकलगी (काँग्रेस) -1026, प्रभाग 5 -सुरेश माळी(शेकाप) -1435 , तानाजी गोडसे (महायुती) -425, प्रभाग 6- रंजना बनसोडे (महायुती)-1148 , शारदा आदलिंगे (शेकाप)-1141 , गजानन बनकर 831 (शेकाप), नवनाथ पवार 720 (महायुती), प्रभाग 7 -रफीक तांबोळी 919 (शेकाप), मधुकर बनसोडे 748 (महायुती), स्वाती मगर 839 (शेकाप), शोभा देशमुख 826 (महायुती), प्रभाग 8 -शोभा घोंगडे 1217(महायुती), वंदना दिवटे 1196( शेकाप), जुबेर मुजावर 1276 (राष्ट्रवादी), कमरुद्दीन खतीब 959 (महायुती), प्रभाग 9 -सचिन लोखंडे 1144 (राष्ट्रवादी),अच्युत फुले 772(महायुती), प्रभाग 10 -अनुराधा खडतरे 918 (काँग्रेस), अनिता वाघमारे 562 (महायुती), चेतनसिंह केदार 895 ( राष्ट्रवादी), विजय इंगोले 633 (महायुती)
बातम्या आणखी आहेत...