आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगोल्यात ११४ दवाखाने चालतात विनापरवाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला- शहरात३९ आणि तालुक्यातील जवळपास ४५ डॉक्टरांकडे व्यवसाय करण्याचे अधिकृत परवाने असून, ११४ डॉक्टरांकडे अद्यापही वैद्यकीय व्यवसाय करण्याचे परवाने नाहीत. शहर तालुक्यातील ज्या डॉक्टरांकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचे परवाने नाहीत अशांनी त्वरित परवाने काढून घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. पियुष साळुंखे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हैदर काझी यांनी केले आहे.
शहरात दिवसेंदिवस हॉस्पिटल क्लिनिक व्यवसाय झपाट्याने वाढत आहेत. तर ग्रामीण भागातही सरासरी गावनिहाय एखादा दुसरा वैद्यकीय व्यवसाय चालवला जात आहे. मात्र वैद्यकीय व्यवसाय नोंदणी करणे आवश्यक असूनही अनेक डॉक्टरांनी हॉस्पिटल अगर क्लिनिकची नोंदणी करताच व्यवसाय सुरू ठेवल्याचे तपासणीत निदर्शनास आले.

फौजदारी गुन्हा
^हॉस्पिटल चालू केल्यानंतर तीन महिन्यांच्या आत सिव्हिल सर्जनकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु अशी नोंदणी नसल्यास फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात.” डॉ.पियुष साळुंखे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक, सांगोला

नोंदणी बंधनकारक
बॉम्बेनर्सिंग होम अॅॅॅक्ट १९४९ च्या कलम तीननुसार वैद्यकीय अधीक्षक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे.