आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेसाठी मोजावे लागणार ५० लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘स्वच्छ भारत’साठी केंद्राने सेवाकरात अर्धा टक्का वाढ केली. त्याचा अंमल रविवारपासून होत आहे. स्वच्छतेच्या कामासाठी सोलापूरकर आता ५० लाख रुपये देतील. शहर आणि जिल्ह्यातून दरवर्षी १०५ कोटी रुपये सेवाकर जमा होतो. त्यात आणखी ५० लाख रुपयांची भर पडेल.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला. त्या वेळी साडेबारा टक्के असणारा सेवाकर १४ टक्के झाला. त्यानंतर महिन्यांनी आणखी अर्धा टक्के (०.५) वाढ होत आहे.
त्यामुळे हॉटेल, लॉज, प्रवासी सेवा देणाऱ्या सुविधा, घरे, मोबाइल, दूरध्वनी, बँक, कुरिअर, विमा, फोटोग्राफी, केबल, चार्टर्ड अकौंटंट आदी क्षेत्रातील सेवा महाग होईल. हॉटेलमध्ये गेल्यानंतर १०० रुपयांच्या बिलावर अधिक १४ रुपये भरावे लागायचे. आता १६ रुपये भरावे लागतील.

केंद्रीय उत्पादन शुल्क खात्याकडून सेवाकराची आकारणी होत असते. वाहतूक ते घर खरेदी या मध्यमवर्गीयांच्या गरजांवर सेवाकर आहे. रेस्टॉरंटसह मंगल कार्यालये आणि तेथील केटरिंगवरही सेवाकर आकारला जातो. त्यामुळे या साऱ्या बाबी आता महाग होणार आहेत. लग्नकार्याच्या बजेटमध्ये सेवाकराचा भारही सोसावा लागेल. कारण मंगल कार्यालय, केटरिंग, फोटोग्राफी या क्षेत्रात आता सेवाकर वाढलेला आहे.

५० लाख रुपये अधिक वसूल होणार
^३१मार्च २०१५ अखेर शहर आणि जिल्ह्यातून १०५ कोटी रुपयांचा सेवाकर जमा झाला. आता ‘स्वच्छ भारत मिशन’साठी आणखी ५० लाख रुपये जादा वसूल होतील. त्याचा मुख्य भार रेल्वे वाहतूक, बांधकाम व्यवसाय आणि वातानुकूलित रेस्टॉरंटची सेवा देणाऱ्यांवरच पडेल.'' संजय कुलकर्णी, अधीक्षक,केंद्रीय उत्पादन शुल्क खाते