आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत गजानन महाराजांची पालखी पंढरीकडे रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘माझ्याजीवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी’ या संतोक्तीप्रमाणे शेगावचे संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याने बुधवारी सोलापूरकरांचा निरोप घेत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गेल्या २७ दिवसांपासून पालखीची वाटचाल सुरू आहे.

महाराजांचा पालखी सोहळा ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या नगरीत दोन दिवसांसाठी विसावला होता. मंगळवारी सकाळी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात पालखीचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी आरती झाल्यानंतर पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. जागोजोगी पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

त्वरित स्वच्छता मोहीम
उपलपमंगल कार्यालय परिसरास मंगळवारी जणू मंदिराचे स्वरूप आले होते. बुधवारी पालखी सोहळा पंढरीकडे दिशेने रवाना होताच, वारकऱ्यांच्या एका पथकाने परिसराची स्वच्छता केली. निर्माल्य आदी कचरा गोळा केला. वारकऱ्यांचे एक पथक मागे राहून परिसराची सफाई करत आहे.

श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन गुरुवारी सायंकाळी वाजता माचणूर येथे भीमा नदीच्या काठावर होत असून पालखीचा मुक्काम तीर्थक्षेत्र माचणूर येथील िसद्धेश्वर मंिदर परिसरात आहे. संध्याकाळी भाविकांना नांदे कुटुंबीयांकडून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता तहसीलदार पुनाजी कोथेरे, गटविकास अधिकारी बाळासाहेब कोळी पालखीचे स्वागत करणार आहेत.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता पालखी मंगळवेढ्याकडे मार्गस्थ होणार असून, ब्रह्मपुरी येथे श्री संत दामाजी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चरणूकाका पाटील यांच्याकडे नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा अरुणा दत्तू या पालखीचे स्वागत करणार आहेत. शुक्रवारी सायंकाळी पालखीचा मंगळवेढ्यात मुक्काम असून शनिवारी सकाळी वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.