आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पैसेवाल्यांच्या पुढाकारामुळे होत नाही संत साहित्य सेवा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलन समारोपप्रसंगी नामामृत स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
पंढरपूर - मूठभर पैसेवाल्यांचा उदोउदो करून होणाऱ्या संमेलनातून संत साहित्यांची सेवा होत नसते. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभ्यासक आणि उपासक एकत्र येतात तेथे संमेलन यशस्वी होत असतात, असे मत संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले.
येथील संत तनपुरे महाराज मठात गेले दोन दिवस झाले सुरू असलेल्या पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभ प्रसंगी डॉ. कामत बोलत होते.

या वेळी बद्रिनाथ महाराज तनपुरे, कार्याध्यक्ष वा. ना. उत्पात, आंतरभारतीचे कार्यकर्ते डॉ. गो. रा. कुलकर्णी, विजय भोपाळ, प्रा. चंद्रकांत पोकळे, डॉ. मंगला सासवडे, प्र. द. निकते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. डॉ. अशोक कामत म्हणाले, “राज्यातील प्रत्येक विद्यापीठातून वेगवेगळ्या महान संतांच्या नावे अध्यायन केंद्र सुरू करण्यात यावेत. या अध्यायन केंद्रातून विविध संत वाङमयाच्या अभ्यासाची संधी उपलब्ध करून द्यावी. शासनाने येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची लवकर निर्मिती करावी. नवीन समितीचे गठण झाल्यावर त्यांनी संत नामदेव अध्यासन केंद्राचे काम त्वरित हाती घेऊन ते पूर्णत्त्वास नेण्यास विशेष प्रयत्न करावेत. पंढरी नगरीतील संत नामदेव साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने वेगळे झाले.”
बातम्या आणखी आहेत...