आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरल’ प्रणालीत माहिती भरताना शिक्षकांचे हाल, सर्व्हर डाऊन असल्याने कायम होतो विलंब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - एकाक्लिकसरशी विद्यार्थी, शिक्षक, शाळेसह सर्व प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी तसेच बोगस पटसंख्येसह इतर गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने सरल प्रणाली विकसित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सरलची माहिती भरण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. निर्धारित कालावधीत माहिती अपलोड करण्यासाठी रविवारी शिक्षकांनी कसरत केली. बहुतांश शाळांची माहिती भरण्यात आली नसल्याने दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ देण्यात आली असली तरी शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या अादेशानुसार ‘सरल डाटाबेस’ शाळा, विद्यार्थी तसेच शिक्षकांची माहिती अाॅनलाइन गाेळा करण्यात येत अाहे. ही माहिती एका साॅफ्टवेअरमध्ये भरावी लागणार असून, त्याची जबाबदारी शिक्षण विभागाने शाळा वर्गशिक्षकांवर सोपवली आहे. त्यामुळे शिक्षकांचा वर्गावर शिकवण्यापेक्षा माहिती गाेळा करण्यात वेळ वाया जात अाहे. अाॅनलाइन माहिती भरताना सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेट कनेक्ट हाेत नसल्याने अडचणी येत आहेत.

या अडचणींवर मात करण्यासाठी शासनाने विभागनिहाय तारखा निश्चित करून माहिती भरण्यास सुरुवात करण्यात आली अाहे. त्यात नाशिक विभागासाठी १२ ते १६ ऑगस्टर्पंत ही माहिती भरावयाची होती. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने माहिती भरताना तारेवरची कसरत करावी लागली. रविवारी सर्व्हर डाऊन असल्यामुळे माहिती भरता आली नाही. दरम्यान आता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सध्या सर्वच शाळांमध्ये सरल डाटाबेस प्रणालीसाठी माहिती गाेळा करण्याची, अाॅनलाइन भरण्याची लगीनघाई सुरू अाहे. ही माहिती गाेळा करताना मुख्याध्यापक, शिक्षकांची चांगलीच कसरत हाेत अाहे. दरम्यान, सुरुवातीला ३१ सप्टेंबरपर्यंत ही माहिती भरण्याचे आदेश िदले होते. मात्र, त्यात बदल करण्यात आल्यामुळे शिक्षक संघटनांनी सरल अंतर्गत माहिती सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली आहे.
सर्व्हर डाऊन असल्याने कायम होतो विलंब
ग्रामीणभागात अाजही अनेक विद्यार्थ्यांकडे अाधार कार्ड, रक्तगट अाणि बँक खाते नाही. त्यामुळे शिक्षकांना पूर्ण माहिती मिळत नसून, विद्यार्थ्यांचा अर्ज अपूर्ण अाहे. शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी गेल्या अाठवड्यात रक्तगट, अाधार कार्ड सक्ती नसल्याचे सांगितले. पण अाॅनलाइन अर्जात हे दाेन्ही रकाने असून, त्यात माहिती भरल्याशिवाय अर्ज दाखल हाेत नाही.

इंंटरनेट नसल्याने शाळांची अडचण
अनेकशाळांमध्ये संगणक इंटरनेटची व्यवस्था नाही. त्यामुळे शाळांची गाेची झाली अाहे. तर ज्यांच्याकडे संगणक इंटरनेटची व्यवस्था अाहे तेथे सर्व्हर डाऊन, इंटरनेट कनेक्ट हाेत नसल्याने अडचणी वाढत अाहे. मुदत वाढ देऊनही काम अपूर्ण राहिले आहे.
पंधरा मुद्दे सक्तीचे
सुरुवातीलाशाळांना एकूण ८० प्रकारची माहिती एकाच अर्जात भरण्यास सांगितली होती. मात्र, नियाेजित वेळेत ही माहिती भरणे शक्य नव्हते. त्यामुळे पहिल्या १५ प्रकारची माहिती भरण्यास सांगण्यात आले अाहे.

एकाचवेळी सर्वत्र माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे शिक्षकांना होत असलेल्या त्रासाबाबतची कल्पना शिक्षण संचालकांपर्यंत पोचवली. मुदत वाढवून मिळेल. जगन्नाथ शिवशरण, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी