आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 20 फोटो तुमच्‍या मनाला घालतील माेहिनी, पाहा असे आहे महाबळेश्‍वरच्‍या सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- ब्रिटिश काळापासून देशातच नव्‍हे तर, जगभरात उत्‍कृष्‍ट हिलस्‍टेशन म्‍हणून लौकिक असलेल्‍या महाबळेश्वरला पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. सध्‍या पावसाला सुरूवात झाल्‍याने परिसरातील पर्यटकांची वर्दळ येथे पाहायला मिळत आहे. समुद्रसपाटीपासून 1,372 मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला महाबळेश्‍वरचे मनमोहित करणारे सौंदर्य दाखवत आहोत.
शिवरायांनी अर्पण केला होता सोन्याचा कळस..
- सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे.
- येथील महाबळेश्वराचे देऊळ हे यादव राजा सिंघनदेव याने तेराव्या शतकात बांधले.
- अफझलखानच्या तंबूवरील कापून आणलेले सोन्याचे कळस शिवरायांनी महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले होते.
- महाबळेश्वर मंदिर, जावळीचे खोरे व प्रतापगड या स्थळांना शिवरायांच्या नावाचा संदर्भ आहे.
- महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून पावसाळयात हा परिसर जलमय असतो.
- येथील निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉइंट्स खूप आकर्षक आहेत.
- विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिग पॉइंट हे त्यांपैकी प्रसिद्ध डोंगरकडे होत.
या आहेत नद्या..
- महाबळेश्वर मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गोवित्री या 5 नद्या उगम पावतात.
- येथे पंचगंगेचे सुंदर देऊळही आहे.
- सावित्री ही नदी पश्चिमवाहिनी आहे तर बाकीच्या चार नद्या पूर्ववाहिनी आहेत.
- वेण्णा तलाव म्हणजे तर पर्यटकांचे मोठे आकर्षण होय.
- वाघाचे पाणी या नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात असा समज आहे.
- महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध व लाल मुळे प्रसिद्ध आहेत.
- महाबळेश्वरचे मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध आर्थर सीट पॉइंर्ट..
समुद्र सपाटीपासून 1,340 मीटर उंचीवर असलेला हा महाबळेश्वरमधील एक पॉइंट आहे. सर आर्थर यांच्या नावामुळे या जागेला हे नाव मिळाले. अतिशय नैसर्गिक देखाव्यासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे. हे एक सुंदर ठिकाण आहे. खाली खूप खोल दरी आहे.
मार्गठिकाण
रेल्वे मार्गानेजवळचे रेल्वे स्टेशन-सातारा. येथून 65 किलोमीटर अंतर आहे.
हवाई मार्गानेजवळचे विमातळ-पुणे आहे. येथून अंतर 120 किलोमीटर आहे.
रस्ता मार्गानेपुणे(120किमी) आणि मुंबई (290कि.मी.)पासून उत्तम रस्त्यांची सुविधा
रस्ता मार्गाने
सातारा (मेढा मार्गे,55 किमी.आणि पांचगणी मार्गे 65 किमी.)
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमधून पाहा, महाबळेश्‍वरचे सौंदर्य..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...