आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार माेहितेंच्या पुतण्याची पाेलिसांना मारहाण; दहा अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज / सोलापूर - दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात सहायक पाेलिस निरीक्षक व दाेन पाेलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी शंकरनगरचे उपसरपंच व राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह माेहिते पाटील यांचे पुतणे सत्यशील राजसिंह माेहिते यांच्यासह १० जणांना अटक करण्यात अाली. न्यायालयाने त्यांची दाेन दिवसांसाठी पाेलिस काेठडीत रवानगी केली.

मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास अकलूजजवळील शंकरनगर येथे पोलिस शिपाई इंगोले व चौघुले हे रात्रगस्त देत होते. त्या वेळी सत्यशील मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांच्या गाडीला कट मारल्यावरून पाेलिसांशी त्यांनी वाद घेतला. त्याचे पर्यवसान दोघा पोलिसांना मारहाणीत झाले.

याबाबत माहिती कळताच अकलूज पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक परशुराम कोरके हे घटनास्थळी अाले. त्यांनी अाराेपींशी चर्चा करुन वाद साेडविण्याचा प्रयत्न केला. मात्र अाराेपी एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी कोरके, इंगोले व चौघुले यांना काठ्या व उसाच्या दांडक्याने मारहाण केली. याबाबत कोरके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात अाला. पोलिसांनी सत्यशील मोहिते यांच्यासह सतीश चुंगे, मारुती बागल, मनोज गोडसे, दीपक गायकवाड, शंकर सुतार, विशाल खेंबरे, आकाश गवळी, शंकर गायकवाड, तुकाराम शिंदे यांना अटक केली.