आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावळेश्वर टोलनाक्यावर 3 लाखांचा गांजा जप्त: तिघांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहोळ: सावलेश्वर  टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान गाडी क्रमांक ए. पी ०९ ए. पी ५००५ या स्कोडा गाडीची तपासणी केली असता यात २९ किलो ९५२ ग्राम असा जवळपास २ लाख ९९ हजार ५२० रुपयांचा गांजा तपासणी पथकास सापडला असून गाडी व गांजा असा एकूण १२ लाख ४९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या बाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावलेश्वर टोलनाका येथे करीत असताना सोलापूर कडून स्कोडा गाडी क्रमांक ए .पी. ०९  ५००५ ही गाडी आली असतांना तिची तपासणी करीत असताना गाडीतील तिघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या कुठून आलात व कुठे जाणार आहे असे विचारले असता हैद्राबाद येथून आलो आहोत व पुण्याला चाललो आहोत असे हिंदीतून सांगीतले बोलणे व हालचाली संशयास्पद वाटल्याने डिक्की उघडण्यास सांगीतले ना ना करीत डिक्की उघडली त्यामध्ये स्टेफनी टायर च्या खाली प्लास्टिक मध्ये पॅकिंग केलेली १४ पाकिटे आढळली यात दोन पाकिटे उघडी असल्याने गांजाचा वास आला ती दोन पाकिटे रस्त्यात कोणाला तरी देण्यासाठी उघडी ठेवली असावीत असा अंदाज पोलिसांनी बांधला गांजा असल्याची खात्री पटताच पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी इलेक्ट्रिक वजन काट्याच्या साहाय्याने वजन केले असता २९ किलो ९५२ ग्राम इतका गांजा आढळून आला व स्कोडा गाडी ९ लाख ५० हजार किंमतीची असा १२ लाख ४९ हजार ५२० रुपयांचा मुद्देमालासह एम.रवी राजू माने वय ३२ , रा जिहागुडा , संजयनगर हैद्राबाद ,रावण पुमा नाईक वय २३ दुध्दाळ ,ता . आंदोला जि .संगारेड्डी व रामा चक्रपाणी चार्य रा .कारवान , हैद्राबाद अश्या तिघांनाही मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक राजू राठोड यांनी फिर्याद दिली असून नार्कोटेक्स ड्रग्ज सायकोट्राफिक सबस्टन्स अक्ट १९८५ कलाम २० (ब ) प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के करीत आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...