आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिमयेवाडी, रामवाडी भागातील ३०० जणांना २९ लाखांचा गंडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - बचत गटांच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून लिमयेवाडी आणि रामवाडी भागतील सुमारे ३०० जणांना २९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणामध्ये नांदेडच्या एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
सुमारे ३०० जणांचे ३० बचत गट तयार करण्यात आले. कालांतराने कर्जाचे अामिष दाखवून प्रत्येकाकडून तीन हजार घेतले. काही जणांना शेतीवर दहा लाखांचे कर्ज देतो, असे सांगून त्यांच्याकडून तीस ते चाळीस हजार रुपये काढून घेतले. असे करून तीनशेहून अधिक जणांना फसवल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे.

सौ. नीलम संजय अॅनी (रा. वय ४३, रा. ब्लाॅक नंबर २०, नरसिंहनगर, मोदी) यांनी सलगरवस्ती पोलिसात फिर्याद दिली अाहे. पद्माकर साहेबराव तमासेकर (वय ३५, रा. महाराणा प्रताप गंगा सोसायटी, नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली.

पद्माकर हा मूळचा नांदेडचा अाहे. मागील नोव्हेंबर महिन्यात त्याने राजीवनगर, थोरली इरण्णावस्ती, लिमयेवाडी भागात बचत गट सुरू केला. बारा जणांचा एक गट म्हणत त्याने ३० गट तयार केले. सुरुवातीला पैसे भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन दिले. अार्थिक व्यवहारही सुरळीत चालू होते.

कालांतराने बचत गटावर प्रत्येकी एक लाख रुपये कर्ज मिळवून देतो म्हणून तीन हजार रुपये घेतले. काही जणांना वाढीव खासगी लोन देतो म्हणून तीस ते चाळीस हजार रुपये मागून घेतले. त्यापोटी शेती जमीन तारण म्हणून कागदपत्रे घेतली. पैसे दिलेल्यांना अॅक्सिस भारतीय स्टेट बँकेचे बनावट चेक देत होता.

काही दिवसांनंतर ही फसवणूक असल्याचे लक्षात येताच मागील मे महिन्यापासून लोकांनी पैसे देण्यासाठी पद्माकर याच्याकडे तगादा लावला. कर्ज देतो म्हणून २८ लाख ६१ हजार रुपये घेतले. कर्जही दिले नाही.

कागदपत्रे ताब्यात
^नेमकी गुंतवणूक कशी होती, कोणत्या अाधारे कर्ज मिळवून देणार होता, याबाबत पडताळणी करून तपास करत अाहोत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पद्माकर हा गायब झाला अाहे. त्याचा शोध सुरू अाहे. बचत गटाची कागदपत्रे ताब्यात घेतली जातील. दोन-तीन दिवसात खरे चित्र समोर येईल. अजित कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक
बातम्या आणखी आहेत...