आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कार्टी काळजात घुसली’ बाप-मुलीच्या नात्याचे महत्त्व सांगणारे नाटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - करिअरच्या महत्त्वाकांक्षेपोटी मुलगी तीन वर्षांची असताना घर सोडून गेलेले. बाबा तर १८ वर्षांनंतर त्यांना भेटायला येणारी त्यांची हळवी पण वात्रट कन्या यांच्या ब्लॅक कॉमेडीने भरलेले नाटक म्हणजे कार्टी काळजात घुसली. परिस्थितीपुढे झुकलेल्या दुरावलेल्या पिता कन्या यांच्या नात्याचे महत्त्व सांगणारे हे नाटक रसिकांच्या मनाला हसत हसत हळुवार स्पर्शून गेले.
वसंत सबनीस लिखित या नाटकातील सोलापूरच्या कालिदास कान्हेरे या संगीत दिग्दर्शकाची काल्पनिक कथा आहे. बाबाची भूमिका प्रशांत दामले तर व्रात्य मुलीची भूमिका तेजश्री प्रधान यांनी साकारली आहे. आपल्या नेहमीच्या ग्रेसफुल अनोख्या अदाकारीने दामले यांनी नाटकातील सुरुवातीचा प्रॅक्टिकल कान्हेरे दुसऱ्या अंकातील हळवा डॅडी अप्रतिम साकारला आहे.

तेजश्री प्रधान यांनी साकारलेली कांचन कधी अल्लड कधी हट्टी तर कधी समजूतदार, तर कधी बोल्ड अशी असून त्यांनी अभिनयाचे अनेक पैलू या नाटकातून पुढे आणले आहेत. नाटकातील अर्थपूर्ण संवाद, अशोक पत्की यांचे संवेदनशील संगीत आणि दमदार कलावंताचा अभिनय याने नाटक उंचीवर गेले आहे. उत्तम प्रकाशयोजना पहिल्या अंकातील जुनाट दुसऱ्या अंकातील चकचकीत सेट काळात झालेला बदल सुचवतो. मांडणी एकूण छान झाली आहे.

काळानुरूप बदल
हेनाटक जुने असून नाटकात जुन्या अभिनेत्रींच्या ऐवजी आजच्या करिना, विद्या बालन, करण जोहर अशा बड्या मंडळींच्या नावाचा उल्लेख केला आहे. कांचनचे मोबाइल वापरणे, कांचनच्या तोंडची भाषा हे नवीन बदल आजच्या पिढीच्या अभिरूची काळानुसार केलेले बदल रसिकांना खूप भावले.
बातम्या आणखी आहेत...