आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीसीप्रश्नी अर्थमंत्र्यांकडे बैठक लावणार : पालकमंत्री देशमुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - विशेषमागास प्रवर्गच्या (एसबीसी) शैक्षणिक मागण्यांसाठी आठ दिवसांत अर्थ आणि सामाजिक न्यायमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक लावून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिले. रविवारी सकाळी त्यांनी या प्रवर्गातील नेते आणि कार्यकर्त्यांना बोलावून निवेदन घेतले. त्यानंतर चर्चाही केली.
गेल्या आठवड्यात (ता. १५) शैक्षणिक मागण्या घेऊन या प्रवर्गातील विद्यार्थी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर आले होते. कन्ना चौक येथून विशाल माेर्चा काढला होता. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची पुढील हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी रविवारी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले. या प्रश्नी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे बैठक लावण्यासंबंधी पत्र दिल्याचे ते देशमुख म्हणाले. त्यावर संघर्ष समितीने हा विषय केवळ सामाजिक खात्याशी निगडित नसून, अर्थ नियोजन विभागाशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने लक्ष घातल्याबद्दल संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले. या वेळी समिती अध्यक्ष अशोक इंदापुरे, भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी, सरचिटणीस सत्यनारायण गुर्रम, अशाेक यनगंटी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम, सहसचिव श्रीधर चिट्याल, पद्मशाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश फलमारी, स्वकुळ साळी ज्ञाती संस्थेचे सचिव जयहरी साखरे, मोहन गदगे, माजी नगरसेवक गोविंदराज एकबोटे, भारत कापसे, काेष्टी समाजाचे अध्यक्ष गुरुमूर्ती सद्दलगी, सिद्धारूढ निंबाळे, महांकाळी येलदी आदी उपस्थित होते.
संयुक्त बैठक घेऊन दिवसांत प्रश्न सोडवू

^अधिवेशनअसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ देऊ शकणार नाहीत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सामाजिक न्यायमंत्री आणि संबंधित खात्यांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक घेऊन आठ दिवसांत प्रश्न सोडवू. पालकमंत्रीविजयकुमार देशमुख

विशेष मागास प्रवर्गाच्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना रविवारी देण्यात आले. त्या वेळी जनार्दन कारमपुरी, पांडुरंग दिड्डी, अशोक इंदापुरे, दशरथ गोप आदी मान्यवर दिसत आहेत.

हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच सोडवा
सामाजिकन्याय खात्याच्या मंत्री अाणि सचिवांकडे अनेक वेळा बैठका झाल्या. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच साेडवला पाहिजे, यावरच आम्ही ठाम आहोत. अशोकइंदापुरे, अध्यक्ष, संघर्ष समिती
बातम्या आणखी आहेत...