आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशव्यापी संप :‘एसबीआय’वगळून इतर बँकांचे कर्मचारी संपावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- स्टेटबँक ऑफ इंडियासाठी असलेले नियम आमच्यावर का लादता? अशी विचारणा करत ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज युनियनने शुक्रवारी देशव्यापी संपाची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. अधिकारी कामावर होते. परंतु कारकून मंडळीच नसल्याने व्यवहार होऊ शकले नाहीत. त्याचा फटका ग्राहकांना बसला. ‘एसबीआय’च्या कर्मचाऱ्यांनाच यात सहभाग नव्हता. शुक्रवारचा संप, दुसऱ्या शनिवारची सुटी आणि रविवारची साप्ताहिक सुटी घेऊन बँकांचे कामकाज सोमवारीच सुरळीत होईल.
स्टेट बँकेला जे नियम आहेत, तेच इतर बँकांना लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्याला विरोध करण्यासाठी हा संप झाला. स्टेट बँकेच्या व्यवस्थापनाने त्यातील कर्मचारी संघटनेशी स्वतंत्र करार केला. त्याने तेथील कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढले, अंशकालीन कर्मचारी भरतीवर नियंत्रण आले. त्याने साहजिकच कायम कर्मचाऱ्यांवर ताण आला. याच शर्ती इतर राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यासाठी व्यवस्थापनाने हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु स्टेट बँकेचा हा करार स्वतंत्र आणि वेगळा आहे. तो आमच्यावर का लादता? अशी विचारणा एम्प्लॉइज युनियनने केली.
पुढे वाचा, स्टेट बँकेच्या शर्ती, अटीच्या विरोधात केला संप...