आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूर्णवेळ शिक्षकांचा कल शिकवणी घेण्याकडेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - शाळा महाविद्यालयीन शिक्षक, प्राध्यापकांना नियमानुसार खासगी शिकवणी घेता येत नाही. बार्शी शहर तालुक्यात अनेक शिक्षक प्राध्यापक खासगी शिकवण्या घेत अाहेत. खासगी शिकवणीकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी शिक्षक जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा यामुळे खालावत आहे. भरपूर पगार घेणारे शिक्षक खासगी शिकवण्या घेत असल्याने बेरोजगार प्रोफेशनल शिक्षकांना अडचणीत येत आहे. त्यामुळे प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन आक्रमक होत आहे.

नोकरीला असलेल्या शिक्षकांनी शिकवण्या घेऊ नयेत असा शासन आदेश असून बार्शी शहर तालुक्यात याची पायमल्ली होत आहे. सहावा वेतन आयोगानुसार पगार घेत असलेले शिक्षक खासगी शिकवणी घेत आहेत. यामुळे शिक्षकांचे अध्यापनावर दुर्लक्ष होत असून विद्यार्थी पालक नाहक भरडला जात आहे. यामुळे प्रोफेशनल टिचर्स (बेरोजगार व्यावसायिक शिक्षक) यांच्या शिकवणीशी स्पर्धा होऊन प्रोफेशनल टिचर्सच्या हक्कांवर गदा येत आहे.

वास्तविक प्रोफेशनल टिचर्सना खासगी शिकवणी घेण्यास मुभा असून त्यांच्याकडे शिकवणीला गेले तर शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांकडे असलेल्या गुणांवर गदा येण्याची शक्यात आहे. यासाठी विद्यार्थी, पालक शाळा महाविद्यालयांतील शिक्षकांकडे शिकवणीला पाठवतात. याचा थेट फटका प्रोफेशनल टिचर्सना बसत आहे. यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत असेल तर पालक संबंधितांना जाब का विचारत नाहीत? यावर विचार करण्याची गरज आहे. शिक्षण विभागाने या मुद्दयांचा सर्वंकष विचार करून सेवेत असताना शिकवणी घेणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा शिक्षकांमधील संघर्ष अटळ आहे.

^नोकरीत असलेल्या शिक्षकांना खासगी शिकवणी घेता येत नाही. शासन आदेशाचा तो भंग ठरतो. जिल्ह्यात असे कोठे घडत असेल तर तसा दृकश्राव्य स्वरूपातील पुरावा सादर करावा. अशा शिक्षक, प्राध्यापकांवर कारवाई केली जाईल. पुरावा देणाराचे नाव गुप्त ठेवण्यात जाईल.'' अशोक भांजे, शिक्षण विस्तार अधिकारी, सोलापूर

^नोकरीस असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्याकडेच खासगी शिकवणीला येण्याची सक्ती करत आहेत. प्रात्यक्षिक गुणांची भीती त्यांना दाखवण्यात येते. सुशिक्षित बेरोजगार प्रोफेशनल टिचर्सच्या उपजीवेकेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. याविरोधात असो.ने उपोषण मार्ग अवलंबला होता. परंतु ठोस कार्यवाही झाली नाही. अशा शिक्षकांवर कारवाईसाठी पुन्हा तीव्र आंदोलन करू.'' किरण गायकवाड, अध्यक्ष, प्रोफेशनल टिचर्स