आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराचे ओझे झाले कमी : फळ्यावरच होते पुस्तकवाचन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दमाणीविद्या मंदिर प्रशालेने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करून एक चांगले उदाहरण इतर शाळांसमोर ठेवले आहे. विद्यार्थ्यांना पूर्वी सहा ते सात किलो ओझे वागवावे लागायचे. आता ते निम्म्यापर्यंत आणण्यात त्यांना यश आले आहे.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने एप्रिल २००६ मध्ये जीआर काढला होता. नियमानुसार फार फार तर विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्के वजन दप्तरांचे असले पाहिजे. तीन वर्षांच्या मुलाने दोन किलो ओझे घेऊन ११ वर्षे वयाच्या मुलांनी साडेपाच किलो ओझे घेऊन दिवसातून एकदा २५ फूट पायऱ्यांची चढउतार केल्यास मुलांना विविध प्रकारची पाठदुखी होऊ शकते. पहिलीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हे दोन किलो, तर आठवीतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ४.२ किलोपेक्षा जास्त असू नये.

दमाणी शाळेने प्रत्येक मजल्यावर नळ व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाणी बाटल्यांचे वजन कमी झाले आहे. प्रत्येक मजल्यावर आठ आठ नळांच्या जोडण्या ठेवण्यात आल्या आहेत. यातून साधे थंड पाणी येण्याचे चार चार नळ आहेत. शिवाय हे पाणी फिल्टर्ड असल्याने आरोग्याची हमी आहेच.

येथेहीअसाच काहीसा प्रयोग : जैनगुरुकुल प्रशालेत एकाच बाकड्यावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची वाटणी केली जाते. म्हणजे जर एकाने बीजगणिताचे पुस्तक आणले तर दुसरा मराठीचे आणतो. एका पुस्तकात दोघे अभ्यास करतात.
१. अभ्यासक्रमातील जोड विषयांसाठी (उदा. इभूना-अर्थशास्त्र, गणित-भूमिती) एकच वही वापरावी.
२. १०० पानी वह्या जोड विषयांसाठी वापराव्यात आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र वह्या.
३. कार्यानुभव, चित्रकला, समाजसेवा, संगणक, शारीरिक शिक्षण या विषयांसाठी वह्या असल्यास त्या शाळेतच ठेवाव्यात. दररोज किमान तीन तासिकांना वह्यांची गरज भासणार नाही असे वेळापत्रक.
४. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांशिवाय अन्य पूरक साहित्य (गाईड, मार्गदर्शक, व्यवसायमाला) शाळेत वापरू नये. ते साहित्य आणण्याचा आग्रह करू नये.
एसएमएस सेवा - शाळेतकोणता कार्यक्रम असेल, पालकसभा, ओपन डे, शाळांना सुटीचे मेसेज, पाल्य शाळेत गैरहजर असेल, येण्यास उशीर झाला असेल तर त्यासंबंधी मेसेज थेट पालकांच्या मोबाइलवर पाठवण्याची सुविधाही आहे.

वह्या - पूर्वीप्रत्येक विषयासाठी २०० पानी वह्या दप्तरात असायच्या. आता वेळापत्रकाप्रमाणे चार ते पाच वह्या, तेवढीच पुस्तके दप्तरात आहेत. २०० ऐवजी ७० पानी वह्या आल्याने वजनातही ६०० ते ७०० ग्रॅम घट झाली आहे.

कॅलेंडर सुविधा - शाळेतर्फेकॅलेंडर नामक लिखित वहीची सुविधा आहे. त्यात घरचा अभ्यास लिहून दिला जातो. त्यानुसारच अभ्यास, दुसऱ्या दिवशीचे तास वह्यापुस्तकांची सूचना दिल्याने आवश्यक तेवढेच दप्तर शाळेत येते.

जेवणाचा डबा - आताशालेय पोषण आहाराच्या भोजनाबरोबर एक भाजी आदी जेवण शाळेतच बांधण्यात आलेल्या नव्या डायनिंग हॉलमध्ये देण्याची सुविधा आहे. यामुळे डब्याचेही जवळपास १५० ग्रॅम ओझे कमी झाले आहे.

चित्रकला वही - जवळपास१०० ग्रॅम वजन असणाऱ्या चित्रकला वहीचे तास ठरवून दिले आहेत आणि वर्गातच एक रॅक करून त्यात ती ठेवण्याची सुविधा केल्याने १०० ग्रॅम इतके वजन दप्तरातून कमी झाले आहे. याचा दिलासा मिळाला आहे.

वॉटरबॅग : मुलांनापिण्याच्या पाण्यासाठी पूर्वी पाण्याची बाटली न्यावी लागत असे. ऑगस्टपासून जवळपास २५० ग्रॅम वजन असणारी वाॅटरबॅग वागवण्याची गरज आता राहिलेली नाही. शाळेत वॉटर फिल्टर आरओ मशिन लावले आहे.

सर्वतोपरी प्रयत्न सुरूच
विद्यार्थ्यांच्यादप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच हा एक भाग आहे. शिवाय शासनाच्या नियमानुसार हे बदल करीत आहोत. नंदकिशोरभराडिया, सचिव, दमाणी शाळा
बातम्या आणखी आहेत...