आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय पोषण आहारातील खिचडीत पाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - तालुक्यातील तुगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाच्या वतीने मुलांना दिल्या जाणाऱ्या खिचडीमध्ये मृत अवस्थेतील पालीचे तुकडे निघाल्याने २१ विद्यार्थ्यांत मळमळ, पोटदुखी, घसा दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसून लागल्याने वैद्यकीय अधिका-यांना बोलावून विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तुगाव जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते आठवीच्या वर्गात एकूण २०२ विद्यार्थी शिक्षण घेतात. दुपारी वाजता खिचडी देण्यात आली. काही मुलांनी शाळेतच खिचडी खाल्ली तर काहीनी घरी नेली. वैष्णवी संतोष दुधभाते हिने खिचडीचा डबा उघडला तेव्हा त्यात पालीच्या अंगावरील कातडी आढळून आली. तिने आईस सांगितल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीच्या आईने शाळेत येऊन मुख्याद्यापक एस. ए. सारणे यांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला. मुख्याद्यापकांनी तत्काळ सर्व वर्गातील विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता, त्यातील काही मुलींना घसा दुखणे, पोट दुखणे, मळमळ होणे असा प्रकार होत झाल्याचे कळले. तेव्हा त्यांनी येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास फोन करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. वैद्यकीय अधिका-यांनी मुलांची तपासणी केली असता २१ मुलांना याचा त्रास होत असल्याचे आढळून आले. मुरूम पोलिसांनी पंचनामा केला.

अधीक्षकाची विचारपूस
पोषणआहार अधीक्षक ए. बी. शिंगडे यांना फोन करून विचारणा केली असता सुरुवातीला तर त्यांनी मला प्रकार माहीत नाही असे सांगितले. मात्र, मुख्याध्यापकांनी फोन केला होता का अशी विचारणा केल्यास हो फोन आला होता. मात्र, फोनवरून माहिती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मुलांना विषबाधा झाली नसल्याची खात्री पटली आहे. कारण, उलटी शौचास लागणे हे विषबाधेचे प्रकार आढळून आले नाहीत. मळमळ करणे, पोट दुखणे, घसा खरखर करणे यावर उपचार करण्यात आला आहे. अन्नाचे नमुने घेतले. मुलांना घाबरल्याने मळमळ होते.'' डॉ.डी. एन. जोशी, वैद्यकीय अधिकारी, येणेगूर.

घाणीच्या साम्राज्यात किचन शेड
येथीलकिचन शेड पत्र्याच्या खोलीत अत्यंत घाण अवस्थेत आढळून आले. या ठिकाणी जाळण्यासाठी आणलेले सरपण, उघड्यावर ठेवण्यात आलेले तांदूळ इतर कच्चा माल पडला होता. स्वयंपाकी मदतनिसांचा हलगर्जीपणा आढळून आला. खिचडी बनवताना स्वच्छता असावी लागते. येथे घाणीच्या विळख्यात अन्न शिजवले जाते.